पतिच्या पहिल्या घटस्फोटाला कारणीभूत तूच म्हणणाऱ्यांना; Hansika Motwani नं दिलं जशास तसं उत्तर

Hansika Motwani नं सोशल मीडियावर तिच्या या शोचा ट्रेलर शेअर केला आहे. दरम्यान, तो सोशल मीडियावर शेअर करत थोडक्यात हंसिकानं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. 

Updated: Feb 10, 2023, 05:35 PM IST
पतिच्या पहिल्या घटस्फोटाला कारणीभूत तूच म्हणणाऱ्यांना; Hansika Motwani नं दिलं जशास तसं उत्तर title=

Hansika Motwani Talked About Her Husband's First Marriage : हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानी तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत (Sohail Kathuria) 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमध्ये लग्न बंधनात अडकली. या दोघांचा शाही विवाह सोहळा हा चर्चेत राहिला होता. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, लग्नाच्या काही दिवसांआधी हंसिकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्याचं कारण म्हणजे सोहेलचं हे दुसरं लग्न होतं आणि त्याचं पहिलं लग्न हे रिंकी बजाज नावाच्या मुलीशी झालं होतं. दरम्यान, सोहेलच्या पहिल्या लग्नात हंसिका नाचताना दिसली होती. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि हंसिकानं सोहेलशी लग्न केलं. 

हंसिका मोटवानीनं तिच्या लग्नातील आणि त्या आधी कोणत्या गोष्टी घडल्या याविषयी सांगितले आहे. अनेकांनी तर हंसिकाला मैत्रिणीचा संसार मोडत तिच्याच पतीशी लग्न केल्याचे देखील आरोप केले होते. सतत होणाऱ्या टीकेवर हंसिकानं आता स्पष्ट उत्तर दिलं आहे. हंसिका तिच्या लग्नाची स्टोरी ही डिस्ने+हॉटस्टारवर  प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याचा पहिला एपिसोड आज प्रदर्शित झाला. यामध्ये हंसिका व सोहेल दोघांनीही त्याच्या पहिल्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. हंसिकाच्या या शोचे नाव Hansika's Love Shaadi Drama असं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हंसिकानं तिच्या लग्नाचा प्रोमो देखील शेअर केला आहे. दरम्यान, प्रदर्शित झालेल्या पहिल्या एपिसोडमध्ये सोहेल बोलतो की “ सगळ्यात आधी माझं पहिलं लग्न झालं याची बातमी समोर आली होती. मात्र, ती चुकीच्या पद्धतीनं समोर आली होती. हंसिकामुळेच माझं ब्रेकअप झालं, लग्न मोडलं, अशा अनेक गोष्टी सांगत ती बातमी छापली जात होती. खरं तर ते पूर्णपणे खोटं आहे." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोहेलच्या या वक्तव्यावर हंसिका काही गोष्टी अॅड करत म्हणाली, "फरक इतका होता की मी त्या व्यक्तीला ओळखत होते, यात माझी चूक होती का? तर असं नाही. माझ्या त्याच्याशी काहीही संबंध नाही. मी एक पब्लिक फिगर किंवा सेलिब्रिटे आहे. याकारणामुळे माझ्यावर बोट ठेवणं आणि माझी इमेज एका व्हिलन सारखी बनवनं सोपं आहे. सेलिब्रिटी असल्यावर या गोष्टी होतात आणि मी ती किंमत मोजली आहे." 

हेही वाचा : Shah Rukh Khan च्या घड्याळाची किंमत इतकी की तेवढ्यात बंगला, गाडी अन् बरंच काही येईल

पहिल्या लग्नाविषयी बोलताना सोहेल पुढे म्हणाला, "माझं पहिलं लग्न हे 2014 साली झाले होते आणि ते लग्न फार काळ टिकले नाही. या परिस्थितीत हंसिका माझी मैत्रिण होती आणि त्यामुळे कोणाला तरी आमच्या लग्नातील फोटोंमध्ये ती दिसली. या कारणामुळेच सगळ्या गोष्टी सुरु झाल्या होत्या. त्यानंतर हंसिकामुळे माझं लग्न मोडलं असे म्हटले जाऊ लागले त्यावेळी या सगळ्या बातम्या पाहून मला धक्का बसला होता."