मुंबई : स्त्री असणं सोपं नाही. समाजाच्या टोमण्यांचा सामना करावा लागतो, चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात आणि असं असतानाही हसतमुखाने आयुष्य जगावं लागतं आणि अशी वागणूक केवळ सर्वसामान्य महिलांसोबतच नाही तर टीव्हीशी संबंधित महिलांसोबतही घडते. टीव्ही क्षेत्रात काम करणारी महिला घटस्फोटित असेल तर तिने काहीतरी पाप केलं आहे असंच लोकांना वाटतं. क्वचितच कोणत्यातरी घटस्फोटित पुरुषाकडे बोट दाखवलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे काही सोसावं लागतं ते फक्त स्त्रीलाच सहन करावं लागतं. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी हिला अशाच काहीशा वेदनांचा सामना करावा लागला आहे. आज जरी काम्या तिचा पती शलभ डांग यांच्यासोबत आनंदाने जगत असली तरी तिने ते दुःखाचे प्रसंगही पाहिले आहेत. तेव्हा लोकं तिला घटस्फोटी म्हणून टोमणे मारायचे.


घटस्फोट झाला तेव्हा लोकं टोमणे मारायचे.
काम्याने स्वतः एकदा सांगितलं होतं की, ''बिग बॉसमध्ये काहीतरी घडल्यानंतर लोकांनी मला घटस्फोट घेण्याबद्दल कसे टोमणे मारले होते. मला रोज अशा टोमण्यांचा सामना करावा लागला. जणू काही गुन्हाच केला होता. असं असूनही माझं जीवन सामान्य पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला. मी काही बोलायचे नाही पण आतून मी  खूप रडायचे.''


घटस्फोट होणं हा शाप नाही 
काम्या पुढे म्हणाली, ''जर तुम्हीही घटस्फोटाच्या वेदनातून जात असाल तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की, घटस्फोटित स्त्री असण्यात काही चुकीचं नाही, उलट तुम्हाला असं वाटलं पाहिजे की, तुमच्यापेक्षा बलवान महिला कोणीच नाही. तिने सन्मानाच्या बाबतीत तडजोड केली नाही आणि गुदमरून मरण्याऐवजी तिने आपलं जीवन मुक्तपणे आणि आनंदाने जगण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट होणं हा डाग नाही. मात्र हे दर्शवितं की, तुम्ही समाजाच्या अतिरेक आणि टोमण्यांकडे लक्ष न देता तुमच्या आनंदाला प्राधान्य दिलं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही.''