मुंबई : 'कंचना 3' (Kanchana 3) सह अनेक सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री एलेक्जेंडर जावी (Alexander Djavi) चा शुक्रवार गोवाच्या सियोलिम गावात एका घरात मृतदेह आढळला. ती राहत असलेल्या फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला. गोवा पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवायचा आहे. पण त्याआझी रशियाच्या वाणिज्य दूतावासाची परवानगी प्रतिक्षा पाहिली जात आहे.( Kanchana 3 actress Alexandra Djavi found dead in Goa )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, सध्या अभिनेत्रीचा मृतदेह हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. रशियाच्या दुतावासाकडून जोपर्यंत एनओसी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह पोस्टमार्टमला पाठवता येणार नाही. पोलीस या प्रकरणात चौकशी करत असून तिच्या प्रियकराचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.



अभिनेत्रीचा प्रियकर देखील तिच्या सोबतच राहत होता. पण जेव्हा अभिनेत्रीचा मृत्यू झाला तेव्हा तो घरी नव्हता. मुंबईतील रशियाच्या वाणिज्य दूतावासाने पोलिसांना एका संशयित फोटोग्राफरच्या चौकशीची विनंती केली आहे.


रशियाच्या या महिलेने चेन्नईतील एका फोटोग्राफरवर 2019 मध्य़े लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.