मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या 'लॉकअप' या शोमध्ये तुम्ही आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे पाहिले असतील, पण यावेळी समोर आलेलं सत्य खूप धक्कादायक होतं. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणतीही माहिती उघड झाली नसली तरी, शोमध्ये अंजली अरोरासोबतच्या त्याच्या लव एंगलमुळे तो वर्चस्व गाजवत होता. अशा परिस्थितीत वीकेंडला शोमध्ये कंगनाने मुनव्वर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्यातील विषय खोदून काढला आहे. या प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहित मुनव्वरला आहे एक मुलगा 
स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये खुलासा केला आहे की, तो विवाहित आहे आणि तो एका मुलाचा पिता आहे. त्याचं लहान वयातच लग्न झालं होतं. एवढंच नाही तर त्यांना एक मुलगाही आहे. पत्नी आणि मुलामुळेच या शोमध्ये आल्याचं मुनव्वरने सांगितलं.


कंगनाने दाखवला फोटो 
लॉक अपच्या निकालाच्या दिवशी, होस्ट कंगना रणौतने मुनव्वर फारुकीला सोशल मीडियावर फिरत असलेल्या अफवांबद्दल सांगितलं. तिने मुनव्वरला विचारलं की, तो या मागचं सत्य सांगेल का? यानंतर तिने मुनव्वरचा एक अस्पष्ट फोटो दाखवला, जो पाहून सगळेच हैराण झाले. यावर मुनव्वरने प्रथम बोलण्यास नकार दिला. मात्र, कंगना राणौतचं मन वळवल्यानंतर त्याने सत्य सांगितलं. कॉमेडियन म्हणाला की, त्याच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. या लग्नातून त्याला एक मूलही आहे.


महिला आणि मुलासोबतचा फोटो व्हायरल
मुनव्वर फारुकीचा महिला आणि मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की, या लोकांशी मुनव्वर फारुकीचे काय नातं आहे. आता या कॉमेडियननेच शोमध्ये याचा खुलासा केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मुनव्वर फारुकी म्हणाला की,''तो गेल्या दीड वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहत आहे. त्याचा घटस्फोटाचा खटला अजूनही कोर्टात सुरू आहे, यामुळेच तो याबाबत जाहीरपणे बोलू शकत नाही. मुनव्वर यांच्या या खुलाशानंतर सगळेच आश्चर्य चकित झाले आहेत. मुनव्वरवर आपलं प्रेम व्यक्त करणाऱ्या अंजली अरोराला हे ऐकून धक्काच बसला आणि ती पूर्णपणे गप्प राहिली. मुनव्वरचे कौतुक करत कंगना राणौत म्हणाली की, तु या प्रकरणातून व्यवस्थित बाहेर पडला आहेस.