मुंबई : कंगना-ह्रतिक केस मुंबई क्राईम ब्रँचकडे देण्यात आली आहे. ही केस मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडं होती. आता तिचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे. चार वर्षानंतर कंगनाच्या केसचा पुन्हा तपास होणार आहे. ह्रतिकनं केलेल्या तक्रारीची फाईल ओपन झाली आहे.


हृतिकने २३ मे २०१६ रोजी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. क्राईम बँचचे इंटिलिजन्स युनिट आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
ह्रतिकनं २०१७ साली या प्रकरणाची सगळी कागदपत्रं सायबर पोलीस स्टेशनला दिली होती. तरीही या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं झाला नाही असा दावा ह्रतिकच्या पक्षाकडून करण्यात आलाय. ह्रतिक या संदर्भात बड्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटला होता असा दावा केला जात आहे.