मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांना लक्ष्य केले आहे. कंगनाने या दोघांवर शेतकऱ्यांना भडकवून गायब झाल्याचा आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने शेतकरी आंदोलनात भाग घेतलेल्या एका वयस्कर महिलेचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिच्यावर टीका झाली होती. त्यानंतर तिने प्रियंका आणि दिलजित यांना लक्ष्य केलं आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.



कंगनाने तिच्या ट्विटरवर म्हटलं आहे की, 'दिलजीत आणि प्रिंयका जे शेतकऱ्यांसाठी लोकल क्रांतिकारी भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी फक्त एक गोष्ट सांगावी की त्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे. दोघे शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम करत आहेत. या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, सिंधु बॉर्डरवर जे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यांना माहितच नाही की ते कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या नेत्यांनी त्यांना 2-3 पॉईंट सांगितले आहेत, तेच ते रिपीट करत आहेत.'



प्रियंका आणि दिलजीत दोसांज यांच्यावर ट्विट करत कंगनाने टीका केली आहे.