मुंबई : मुंबई महानगरपालिकेनं ऑफिस तोडल्यानंतर आक्रमक झालेल्या कंगना राणावतने पुन्हा एकदा ट्विटबाजी केली आहे. यावेळी कंगनाने ट्विटद्वारे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आवाहन केलं आहे. सोबतच शिवसेनेलाही टोला लगावला आहे. सोनिया गांधींनी धारण केलेल्या मौनावरच कंगनाने प्रश्न उभे केले आहेत. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून हे प्रश्न उभे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना ट्विटमध्ये लिहिते की, आदरणीय सोनिया गांधी जी, एक महिला होण्याच्या नात्याने तुमच्या महाराष्ट्र सरकारने मला जी वागणूक दिली. त्याबद्दल तुम्हाला दुःख झालं नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार आपल्या सरकारला वागणुक करायला सांगणार नाही का?  



दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना म्हणते की, तुम्ही भारतात राहता. तुम्हाला महिलांच्या संघर्षाची माहिती असेल. जेव्हा तुमचं सरकार महिलांना त्रास देत आहे. आणि कायदा त्याची थट्टा करत असे. तर इतिहासात तुमच्या मौनावर प्रश्नचिन्ह उभे राहतील. मला आशा आहे, तुम्ही या प्रकरणात लक्ष घालाल.



यानंतर कंगना म्हणते की, बाळासाहेब टाकरे हे तिचे सर्वात आवडते व्यक्ती. आज बाळासाहेब असते आणि आपल्या पक्षाची ही अवस्था पाहून त्यांना काय वाटलं असतं.



'ही बाळासाहेबांची शिवसेना नाही', म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारने माझ्या मुलीसोबत चुकीचं केलं आहे. शिवसेना माझ्या मुलीवर अन्याय करत आहे. संपूर्ण भारतातील जनता हे अजिबात खपवून घेणार नाही, असं आशा राणौत यांनी म्हटलं आहे.