Kangana Ranaut on Karan Johar : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनानं नुकतीच एक पोस्ट करत कपूर कुटुंबाच्या मुलावर कंगणानं निशाणा साधला आहे. कंगणा रणौत यावेळी रणबीर कपूरविषयी बोलत होती. तर तिनं हे देखील सांगितलं की रणबीर तिला त्याच्यासोबत  रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी विनवण्या करत होता. त्यासोबत तिनं त्याच्या लग्नाला देखील फेक म्हटलं होतं. आता कंगणानं दिग्दर्शक करण जोहरच्या रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटावरून निशाणा साधला आहे. त्यासाठी कंगणा रणौतनं करण जोहरचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत तिनं म्हटलं आहे की कशा प्रकारे तो त्याच्या फ्लॉप चित्रपटाला हिट देखील दाखवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत करण जोहर एका विद्यार्थ्यानं पीआरवर प्रश्न विचाराला. त्यावर उत्तर देत करण बोलतो की 'आकडे बदलता येतात. पैसे देऊन काहीही बदलता येतं. करणचा हा व्हिडीओ शेअर करत करणनं कॅप्शन दिलं की करण जोहर जी म्हणत आहेत की मी लोकांच्या मनात काहीही घालू शकतो... हिटला फ्लॉप आणि फ्लॉपला हिट बनवू शकतो. दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस बनवू शकतो, फक्त पैसे द्यायचे. करण जोहरजी फक्त त्यांच्याच चित्रपटाला हिट करतात की इतरांचं निगेटिव्ह पीआर करतात आणि त्यांचे चित्रपट फ्लॉप करतात. तुम्हाला काय वाटतं, करण जोहर योग्य बोलत आहेत?'



हेही वाचा : सलमान खानचं ऐकलं अन् Kiara Advani चं जग असं बदललं, अभिनेत्रीच्या 'या' गोष्टी जाणून घ्या



दरम्यान, 28 जुलै रोजी करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्या तीन दिवसात 45 कोटींचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे कंगनाचा ‘इमरजेंसी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.