Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. या सगळ्यात कंगनानं नुकतीच एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत कंगनानं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे. कंगना यावेळी म्हणाली की नेताजी सुभाष चंद्र बोस ही स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनानं ही मुलाखतीत 'टाइम्स नाउ समिट' ला दिली होती. यावेळी कंगनानं केलेल्या या वक्तव्यानंतर त्यावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी कंगनाला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही. तर अनेक नेटकऱ्यांनी दावा केला की तिला फॅक्चुअल ज्ञान नाही. तर लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ते कंगनाला म्हणाले की, "सुप्रीम जोकर पार्टीची जोकर ... काय अपमान आहे... फक्त विचारतोय."



त्यानंतर एक नेटकरी म्हणाला, 'जेव्हा आलिया भट्टनं नॅशनल टेलीव्हिजनवर असं काही म्हटलं होतं तेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती. मात्र, ही जवळपास 40 वर्षांची असून कथित राष्ट्रवादी उर्फ अंध भक्त हिच्यासाठी तर हे जीनियस ऑफ द ईयर आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काही वर्षांपूर्वी कंगना रणौतनं हा दावा केला होता की 2014 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता ती बोलते सुभाष चंद्र बोस हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. ही कोणता असा इतिहास सांगते?'




नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक तयार केला. खरंतर, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरु होते. त्यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 त्यांचा मृत्यू होई पर्यंत पंतप्रधान म्हणून कार्यकाळ सांभाळला. जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे राजकारण, आर्थिक आणि सामाजिक गोष्टींना एक योग्य मार्ग देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कंगना रणौतविषयी बोलायचे झाले तर तिला हिमालच प्रदेशातील मंडी येथील उमेदवारीता मिळाली आहे.