Kangana Ranaut on Adipurush: 'आदिपुरूष' या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा रूचलेला नसल्याचे कळून आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी या चित्रपटावर सपाटून टीका केली आहे. त्यातून सोशल मीडियावर ट्रोलर्सनी आता या चित्रपटाला ट्रोल करायलाही सुरूवात केली असून नेटकऱ्यांनी मीम्स करायलाही सुरूवात केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची नाही म्हटलं तरी नेगेटिव्ह पब्लिसिटी होताना दिसते आहे. आता या चित्रपटावला विरोधाची ठिगणी पडल्याची दिसते आहे. त्यामुळे आता यात अभिनेत्री कंगना रणावत हिनं देखील उडी घातली आहे. कंगना ही सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु सोबतच कंगना राणावत सोशल मीडियावरही सक्रिय असते. सध्या तिची एक इन्टाग्राम स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये तिनं प्रभु श्री राम, सीता आणि हुनमान यांचे फोटो शेअर केले आहेत आणि जय श्री राम असं तिनकॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी याला 'आदिपुरूष'च्या चित्रपटाशी कनेक्ट केलं आहे. तिनं अप्रत्यक्षरीत्या 'आदिपुरूष' या चित्रपटावरून टीका केली आहे असं म्हटले आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. कंगना ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असते आता तिनं या चित्रपटावर नकळत टीका करत चित्रपटाच्या विरोधातलं आपलं मतप्रदर्शन केलं आहे. 



कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रभु श्री रामाचे काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये राम आणि सीता सोबतच हनुमान यांचे फोटो आहेत. या फोटोंमध्ये तिनं 'राम का नाम बदनाम ना करो' हे गाणंही बॅकराऊंडला लावलं आहे. हे गाणं 1971 मध्ये आलेल्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटातील आहे. या चित्रपटात देवानंद यांनी अभिनय केला होता. 'आदिपुरूष' हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटात प्रभु श्री रामाची भुमिका प्रभास, सीतेची भुमिका अभिनेत्री क्रिती सनन आणि रावणाची भुमिका सैफ अली खान यानं निभावली आहे. 


हेही वाचा - ''... यासाठीच बॉलिवूड बदनाम आहे''; चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'आदिपुरूष'वर व्यक्त केली नाराजी



कंगनाही सध्या आपल्या चित्रपट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. सोबतच 'टिकू वेड्स शेरू', 'तेजस', 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे कंगनाची फारच चर्चा रंगली आहे.