Kangana Ranaut Film Emergency Release Postponed : खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही गेल्या अनेक दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट एमरजेंसीमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून अनेक वाद सुरु होते जे संपायचं नाव घेत नाही आहेत. यासगळ्यात कंगना रणौतनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा तिनं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलत असल्याचं सांगितलं आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे यावेळी तिनं कोणतीही तारिख दिली नसली तरी कारण मात्र, सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रणौतनं तिच्या आधीच्या ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं चित्रपटाची तारिख पुढे ढकलण्याविषयी सांगत त्याचं कारण देखील सांगितलं आहे. या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की 'मी दिग्दर्शित केलेला चित्रपट एमरजेंसीच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. आम्ही अजूनही सेंसर बोर्डाच्या सर्टिफिकेटची प्रतीक्षा करत आहोत. लवकरच नव्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करू, तुमच्या समजूतदारपणासाठी आणि धैर्यासाठी धन्यवाद.' दरम्यान, कंगनाची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर विविध कमेंट करत आहेत.



एक नेटकरी म्हणाला, 'भाजप खासदारासोबत असं होत असेल तर सर्वसामान्यांसोबत कसं काय होईल.' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


कंगना रणौतचा हा चित्रपट आज 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. सेंसर बोर्डाला अजून या चित्रपटासाठी सर्टिफिकेट मिळालेलं नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सगळ्या वादात बॉम्बे हायकोर्टाकडे धाव घेतली आहे. ज्यावर निर्णय घेत हायकोर्टानं सेंसर बोर्डाला सांगितलं आहे की कंगना रणौतच्या चित्रपटाच्या सर्टिफिकेटवर 18 सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्यावा. 


कोर्टाच्या या निर्णयानं ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की दोन आठवडे कंगना रणौतचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही आहे. जेव्हा सेंसर बोर्ड या चित्रपटाला सर्टिफिकेट देईल, त्यानंतर अर्थात 19 सप्टेंबरला हायकोर्टात या याचिकेवर सुनावणी होईल. 


हेही वाचा : ब्रेस्ट कॅन्सरमध्ये Mucositis ची शिकार झाली Hina Khan! वेदनेला कंटाळून पोस्ट शेअर करत म्हणाली...


दरम्यान, कंगना रणौतच्या एमरजेंसीविषयी बोलायचे झाले तर तिनं स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ज्यात अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. कंगना या चित्रपटात दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कंगनाशिवाय या चित्रपटात अनुपम खेर, मिलिंद सोमन, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दिवंगत अभिनेता सतीश कौशिक दिवंगत माजी पंतप्रधान जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे.