Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाकडून निवडणूकीसाठी तिकिट मिळालं आहे. तेव्हापासून कंगना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी दावा केला की कंगनानं तिच्या सोशल मीडियावर ती बीफ खात असल्याचं म्हटलं आहे. तरी देखील तिला भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कंगना वादात सापडली होती. यावर कंगनानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाला हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूकीसाठी उतरली आहे. कंगनानं तिच्या बीफ खाण्याच्या अफवांवर लजास्पद आणि चूकिंचं म्हटलं आहे. कंगना रणौतनं सांगितलं की ती खरी हिंदू आहे. कंगनानं तिच्या आधीच्या ट्विटर म्हणजेच X अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत कंगना म्हणाली, "मी बीफ किंवा कोणत्याही प्रकारचं लाल मांस खात नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे ती माझ्याविषयी चुकिच्या अफवा पसरवल्या जातात. मी दशकांपासूस योगिक आणि आयुर्वेदिक जीवनाच प्रचार करते. आता माझी प्रतिमा खराब करण्यासाठी असे डावपेज वापरण्यात येत असले तरी ते काही कामी येणार नाही. माझ्या लोकांना माहित आहे की मी अभिमानी हिंदू आहे."



कंगनानं सांगितलं की कॉंग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांच्या दोन दिवसांनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलं की कंगना रणौतनं एकदा म्हटलं होतं की "ती बीफ खात नाही. एका सभेत बोलताना, महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी दावा केला की कंगना रणौतनं तिच्या X अकाऊंटवर म्हटलं होतं की तिला बीफ आवडतं आणि ती खाते. तरीही भाजपनं तिला निवडणूकीचं तिकिट दिलंय."


हेही वाचा : गोविंदाचं 'या' अभिनेत्रीवर होतं क्रश, विवाहीत असूनही तिच्या सौंदर्यानं लावलं होतं वेड 


दरम्यान, खरंतर कंगनानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरु एकदा एक पोस्ट शेअर केली होती आणि त्याला धर्माशी जोडू नका असं देखील सांगितलं होतं. तेव्हा कंगनाची टीम तिचं अकाऊंट पाहायची. कंगनाच्या बाजूनं तिच्या टीमनं लिहिलं होतं की "बीफ किंवा कोणत्याही प्रकारचं मांस खाणं चुकीचं नाही. हे धर्माविषयी नाही." कंगना विषयी बोलायचे झाले तर 8 वर्षांपूर्वी ती शाकाहारी झाली होती.