मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या लग्नाचा आनंद त्यांच्या जगभरातील चाहत्यांना होतोय. पण काही जण यामुळे नाराजही झालेले दिसताहेत. भारतातील निर्मात्यांची नावे यामध्ये सर्वात पुढे होती पण आता एका अभिनेत्रीचे नावही पुढे आलंय. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कंगना रनौत आहे. एका इव्हेंटमध्ये कंगनाला प्रियंकाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 'प्रियांका माझी चांगली मैत्रिण आहे, तिने मला लग्नाबद्दल न सांगितल्याने मी तिच्यावर नाराज असल्याचे', कंगनाने सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघींनी मधूर भांडारकरच्या फॅशन सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दोघींच्या कॅटफाईटच्या चर्चाही समोर आल्या होत्या.


यावर कंगना म्हणते. 'प्रियांका माझी चांगली मैत्रिण आहे आणि ती मला कोणत्याही पत्रकारापेक्षा जास्त चांगली ओळखते.'


निर्माते नाराज 


भारतातील निर्मात्यांनी प्रियांकावर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलीयं. भारत सिनेमातून प्रियांकाने बॅकआऊट केल्याचे काही दिवसांपुर्वीच समजले होते. सलमानचे भावोजी अतुल अग्नहोत्रींची कंपनी रील लाइफ प्रोडक्शन हा सिनेमा करणार आहे. या सिनेमाचे सीईओ निखिल निमित यांनीही प्रियांकावरची नाराजी व्यक्त केली.


लग्नामुळे मी 'भारत' सिनेमा सोडत असल्याचे दोन दिवस आधी प्रियांकाने सांगितले. प्रियांकाचे हे वागणे अनप्रोफेशनल होते असे निखिल यांनी सांगितले. प्रियांकाच्या या निर्णयानंतर सलमान खान खूप नाराज असल्याचे वृत्त 'बॉलीवुड लाइफ'ने दिलंय. प्रियांकासोबत कधी काम न करण्याचा निर्णय सलमानने घेतल्याचीही माध्यमांमध्ये चर्चा आहे.