Kangana Ranaut on Wedding : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आता कंगना तिचा आगामी चित्रपट 'तेजस' च्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. तिचे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. तर कंगनानं नुकतीच तिच्या लग्नाची प्लॅनिंग केली असून त्याविषयी तिनं सांगितलं आहे. पुढच्या पाच वर्षात कंगना लग्न करण्याचा विचार करत आहे. याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनानं ही मुलाखत 'टाइम्स नाऊ'ला दिली. या मुलाखतीत कंगना म्हणाली की 'ती पुढच्या पाच वर्षात लग्न करण्याचा विचार करते. प्रत्येक मुलगी तिचं लग्न आणि कुटुंब असण्याचं स्वप्न पाहते. मी एक कुटुंब वत्सल स्त्री आहे. कुटुंब माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न हे अरेंज आणि लव्हचं मिक्स असेल तर चांगलं होईल.' 



पुढे तिच्या जुन्या रिलेशनशिप्सविषयी बोलताना कंगना म्हणाली, 'तुम्हाला प्रत्येक नात्यात यश मिळत नाही. त्यातही जर ते यश तुम्हाला कमी वयात मिळालं नाही तर तुम्ही भाग्यवान आहात. माझ्यासोबत देखील तसचं झालं आहे. त्यासाठी मी इतकी सीरिअस होती की जर ते असतं, तर मी माझी सगळी वर्षे मी त्यालाच दिली असती. नशिबानं त्यावेळी ते नातं पुढे टिकून राहिलं नाही. मला वाटतं की देवानं माझी रक्षा केली. पण आपल्याला या सगळ्या गोष्टी आयुष्यात खूप उशिरा कळतात.' 


दरम्यान, याशिवाय आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खानसारख्या कलाकारांविषयी देखील वक्तव्य केलं आहे. कंगना म्हणाली की 'तिचं भांडण हे कधीच पर्सनल नसतं आणि कोणत्याही खान विषयी तिच्या मनात काय तक्रार नाही.' तिनं सांगितलं की 'तिला तक्रार फक्त या गोष्टीची आहे की या तीन ही खानच्या चित्रपटांमध्ये असणाऱ्या महिलांच्या छोट्या भूमिकांची. त्यासोबतच त्यांच्यात आणि अभिनेत्रींमध्ये असलेला वयाचा मोठा फरक.'


हेही वाचा : अक्षयच्या गुलछबू स्वभावाला कंटाळून रवीनानं मोडला होता साखरपुडा, कारण ठरली 'ही' अभिनेत्री


कंगना पुढे चित्रपटसृष्टीत होणाऱ्या पॉझिटिव्ह बदलावर देखील बोलली आहे.zयात ती म्हणाली की 'आता 35-40 वर्षां पेक्षा जास्त वय असलेल्या अभिनेत्रींना आता बॉलिवूडच्या खानच्या अपोझिट कास्ट करण्यात येते. हा कास्टिंगमध्ये झालेला खूप मोठा बदल आहे.'