Why Raveena Broke engagemnt with akshay Kumar : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा आज 49 वा वाढदिवस साजरा करते. रवीना ही सतत चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रवीनाचे आजही लाखो चाहते आहेत. रवीनाचं खासगी आयुष्य तिच्या कामाप्रमाणेच सतत चर्चेत रहायचं. त्यातही तिचं आणि अभिनेता अक्षय कुमारचं रिलेशनशिप हे तर समजा 90 च्या काळचा हॉट टॉपिक होता. त्या दोघांची नेहमीच चर्चा सुरु असायची. त्यांच्या रिलेशनशिपविषय आजही अनेकदा कोणी तरी बोलत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ते दोघं त्यांच्या रिलेशनशिपविषयी खूप सीरियस होते आणि त्यांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र, त्या दोघांचा साखरपुडा जास्त काळ टिकला नाही.
रवीना आणि अक्षयनं मोहरा या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि तेव्हाच त्यांच्यात प्रेम झाले. त्याची सुरुवात ही ते दोघं पंजाबी असल्यानं झाली. ते कसं असा प्रश्न तुम्हाला असेल तर पंजाबी असल्यानं त्याविषयी सतत होणाऱ्या चर्चा आणि त्यांच्यात असलेलं साम्य. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की ते अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते. हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपविषयी सीरिअस होते आणि त्यांच्या रिलेशनशिपला पुढच्या टप्प्यावर न्यायचे होते. अक्षय आणि रवीना या दोघांनी एका मंदिरात गुपचूप लग्न केले असे म्हटले जातं होते. याविषयी रवीनानं एका चॅट शोमध्ये काय सत्य आहे हे सांगितलं. ‘कॉस्मोपॉलिटन’ने दिलेल्या वृत्तानुसार, 'हा एक विचार करून घेतलेला निर्णय होता. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीशी माझा साखरपुडा झाला होता. मला अगदी सामान्य जीवन जगायचे होते. मी लग्नाआधीच काम सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण आम्ही असा विचार केला होता की जेव्हा माझा शूटचा शेवटचा दिवस असेल तेव्हा आम्ही लग्न करू. पण तसं झालं नाही, मग मी माझ्या करिअरकडे लक्ष देत पुन्हा काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा तो पुन्हा म्हणाला की ते सोड आणि आपण लग्न करूया. मग, नंतर मी त्याला सांगितले की, एकदा मी माझ्या करिअरला न निवडता तुला निवडले होते, पण आता मी तुला नाही तर करिअरला निवडेन.”
“हा साखरपुडा मोठ्या जल्लोषात झाला होता. यावेळी पंडित होते आणि त्यांच्याकडून पूजा करण्यात आली होती. त्याचे आणि माझे कुटुंब दिल्लीहून आले होते. त्याच्या घरातल्या एका मोठ्या व्यक्ती माझ्या डोक्यावर लाल दुपट्टा ठेवला होता आणि लोकांना लग्न झालं असं वाटलं.”
हेही वाचा : लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...'
दरम्यान, 1999 मध्ये 'स्टारडस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत रवीनानं सांगितलं होतं की अक्षयला हे लपवायचं होतं कारण त्याला त्याच्या फीमेल फॅन्सना गमावण्याची भीती होती. काही काळ अक्षय आणि रवीनात सगळं काही ठीक होतं. पण 1996 मध्ये खिलाडियों का खिलाडी च्या रिलीजवेळी गोष्टी बदलल्या. अक्षय-रेखाच्या लिंकअपच्या चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे रवीनाला आश्चर्य झाले. अक्षयच्या गुलछबू स्वभावाला रवीना कंटाळली होती. त्यात रेखा आणि अक्षय या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तिला सहन होत नव्हत्या. त्यामुळे त्या दोघांचं नात तुटलं. तर अक्षय विषयी बोलताना रवीना म्हणाली की 'प्रेमात विश्वासच सगळं काही असतो आणि अक्षयने तिचा विश्वासघात केलाय.'
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.