Kangana Ranaut at Ravan Dahan : काल विजयादशमीच्या निमित्तानं देशभरात उत्साह होता. यावेळी रावणाचे दहन करण्यात येते. राम-रावण युद्ध संपन्न होऊ प्रभु श्री राम यांना विजय प्राप्त होतो. काल दसऱ्याच्या निमित्तानं घराघरात उत्साह होता त्याचसोबत बॉलिवूड सेलिब्रेंटीमध्येही दसऱ्याचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला होता. यावेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधले ते कंगना राणावत हिनं. रावणाच्या दहनावेळी कंगनानं धनुष्यबाण हातात घेतला खरा सोबतच परंतु नेम चुकल्यानं तिची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवण्यात आली आहे. यावेळी ट्रोलर्सना ही चांगली नामी संधी प्राप्त झाल्यानं सोशल मीडियावर फक्त आणि फक्त तिचीच चर्चा आहे. कंगना ही अनेक बॉलिवूड टीका करताना दिसते. त्यामुळे तिचे हेटर्सही तिची टिंगल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवरूनही ते स्पष्ट होते. यावेळी कंगना नटून थटून रावण दहनाच्या सोहळ्याला उपस्थित होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनानं मंगळवारी नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध लव कुश रामलीला येथे रावण दहन केले. लाल किल्ल्यावर दरवर्षी या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. समोर आलेल्या माहितीनुसार यावर्षी गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच एका महिलेला रावण दहनाचा मान प्राप्त झाला आहे. ही महिला होती कंगना राणावत. यावेळी तिच्या रावण दहनाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 


सोशल मीडियावर ट्रोलर्सनं उडवली खिल्ली 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की कंगनानं धनुष्यबाण हातात घेतले आहे त्यातून ती निशाणा साधण्याचा वारंवार प्रयत्न करते परंतु तिचा निशाणा साधला जात नाही. यावेळी तिनं तीनवेळा निशाणा साधण्याचा प्रयत्न केला परंतु ती यशस्वी झाली नाही. शेवटी उपस्थित सदस्यांनी तिची मदत केली होती. यावरून ट्रोलर्स तिची खिल्ली उडवत आहेत. 



अभिनेत्याचं ट्विट व्हायरल


यावेळी कंगनानं जय श्रीम राम म्हणत रावणाच्या पुतळ्यावर निशाणा साधला होता. परंतु तो रावणाच्या पुतळ्याऐवजी तीनदा खाली पडतो. यावरून एका अभिनेत्यानं तिची खिल्ली उडवत तिचा हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. केआरनं हे ट्विट केलंय. त्यात तो म्हणाला की, ''व्वा! कंगनाजींनी रावणावर किती जोरदार निशाणा साधला आहे''