मुंबई : बांग्लादेशचा ऑलराऊंडर क्रिकेटर शाकिब अल हसन (Bangladesh cricketer Shakib Al Hasans) काली पूजेत (Kali Puja) पोहोचला होता. यानंतर त्याला मुस्लिम कट्टरपंथियांनी जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी मिळाल्यानंतर शाकिब अल हसनने माफी मागितली. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने एकापाठोपाठ अनेक ट्विट केले आहेत. कंगना यावेळी सवाल करते की,'मंदिरात जाण्यापासून तुम्ही का घाबरता. काही तरी कारण असेलच. काही तरी कारण असेलच. मी संपूर्ण आयुष्य जरी मशिदीत राहिले तरी मुखातून राम नाम जाणार नाही. स्वतःच्या श्रद्धेवर विश्वास नाही का?'



कंगना म्हणते की, कंगना म्हणते की, त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. ते तुझं घर तोडतील. तुला कारागृहात टाकतील. हे योग्य नाही. कंगनाने मुस्लिम प्रोपेगेंडा पसरवण्यावरून निशाणा साधला आहे. 'जॅक, ट्विटर आणि ट्विटर इंडिया पक्षपात करतात. एक वेगळाच प्रोपेगेंडा चालवतात. जे अतिशय निराशाजनक आहे.' कंगना पुन्हा एकदा या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.