मुंबई : पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणौतने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत शिवसेना आणि बॉलिवूडवर निशाणा साधत आहे. मुंबईने ग्रिड फेल झाल्यानंतरही कंगनाने शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्यानंतर कंगनाने देखील आता महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने एएनआयच्या ट्विटला रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाच्या काळात पूजा- अर्चा करण्यासाठी मंदिरं उघडण्यावरून काही प्रश्न विचारले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही सतत मंदिरं उघडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. तुम्हाला ज्या शब्दाचा राग होता. ते 'सेक्युलर' तुम्ही झाला आहात का? 



राज्यपालांनी पत्र लिहिल्यानंतर कंगनाने टीका केली आहे. एएनआयचं ट्विट रिट्वीट करत लिहिलं आहे की,'हे वाचून बरं वाटलं की, 'गुंडा सरकार'ला राज्यपाल प्रश्न विचारत आहे. गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट तर सुरू केले पण राजकारणाच्या नादात मंदिरं मात्र बंद ठेवली. सोनिया सेना तर बाबरच्या सेनेपेक्षा चुकीचं वागत आहेत.