आपल्या प्रेम कहाणीवर पुन्हा एकदा बोलली कंगणा
कंगणा रनौटच्या प्रेम कहाणीबाबत आतापर्यंत अनेकदा बोलून झाले आहे. त्यामुळे त्यात विशेष असे सांगण्यासारखे काही नसले तरी, तिच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे.
मुंबई : कंगणा रनौटच्या प्रेम कहाणीबाबत आतापर्यंत अनेकदा बोलून झाले आहे. प्रसारमाध्यमांमधूनही अनेकदा त्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे त्यात विशेष असे सांगण्यासारखे काही नसले तरी, तिच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. आपल्या प्रेम कहाणीबद्दल कंगणा पुन्हा एकदा बोलली आहे.
दिलखुलास कंगणा आणि करण
निमित्त होते एका शो चे. चित्रपट निर्माता करण जोहर याच्यासोबत कांगणा एक शोमध्ये एकत्र आली. ज्यामुळे या शोची आणि कंगणाचीही जोरदार चर्चा झाली. अर्थात करणही त्यात आला. कंगणा आणि करण यांच्याबाब गेल्या काही दिसांपासून प्रसारमाध्यमात बरेच काहीबाही येत आहे. त्यात कंगणाने चित्रपट इंडस्ट्रीतील नेपोटिज्मवरून करण जोहरच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती. ज्यामुळे दोघांमध्ये 'वर्ड वॉर' सुरू होते. त्यामुळे दोघांमधील संबंधाबाब चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. मात्र, शो च्या सेटवर दोघेही अगदी मनमोकळेपणे वागले. अगदी मित्रत्वाच्या नात्याने.
अद्याप मी वयाच्या तिशीतही नाही
प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्यांवरून विचार केला तर, शोदरम्यान कंगणा अगदीच फ्रेश मुडमध्ये दिसली. तिला विचारण्यात आलेल्या कोणत्याच प्रश्नाला तिने बगल दिली नाही. मीडिया रिपोर्टनुसा, कंगणाला जेव्हा तिच्या मॅरेज प्लानबाबत विचारले असता तिने सांगितले की, 'का ते कळत नाही. पण, आपल्या समाजात लोक महिलांना ३० वर्षांच्या आसपास आल्या की त्यांचे लग्न व्हावे असा का विचार करतात. खरेतर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आता माझ्याबाबत म्हणाल तर, इतक्यात लग्न करण्याबाबत माझा कोणताच विचार नाही. तसेच, अद्याप मी वयाच्या तिशीतही नाही', इतके बोलून कंगणाने जोरदार हसत हा विषय तेथेच संपवला. दरम्यान आणखी एका कार्यक्रमात तिला तिच्या लव्ह स्टोरीबद्धल विचारले असता तिने मोठ्या मिष्कीलपणे सांगितले की, 'मेरे इश्क के किस्से तो सारे न्यूजपेपर्स में लिखे गए हैं'.