Kangan Ranaut-Rahul Gandhi : हिमाचल प्रदेशच्या मंडीची खासदार कंगना रणौतनं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविषयी विचित्र दावा केला आहे. कंगना यावेळी म्हणाली की तिला वाटतं की राहुल गांधी हे ड्रग्सचे सेवन करतात, त्याची टेस्ट होणं गरजेचं आहे. कंगनानं हे वक्तव्य राहुल गांधी यांनी संसदेत शिवाची वरात असं म्हणत केलेल्या वक्तव्यावर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाली की आपल्याकडे जी लोकशाही आहे, त्यामुळेच लोकांच्या निवडीनुसार पंतप्रधानांची निवड करण्यात आली आहे. कोणतं लिंग, वय, जात किंवा कोणत्या वर्गातून तुम्ही आहात यावरून पंतप्रधानांची निवड करण्यात येते का? त्यांना लोकशाहीचा काही सन्मान नाही का? तिनं पुढे सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टींवर चर्चा करत ते रोज संविधानाला धक्का पोहोचवतात.



कंगनानं पुढे सांगितलं की 'काल देखील संसदेत त्यांनी कॉमेडी शो केला. त्यांना कोणत्याही प्रकारची लाज वगैरे नाही. आम्ही शिवजीची वरात आहोत आणि हे चक्रव्यूह आहे, असं ते काल तिथे बोलत होते. मला तर वाटतं की त्यांची टेस्ट झाली पाहिजे की ते ड्रग्स घेतात.'


कंगनानं पुढे सांगितलं की 'ज्या अवस्थेत ते संसदेत पोहोचून काहीही बडबडतात, काल ते पाहून मी आश्चर्यचकीत झालो. संसदेत ते म्हणाले की ही एक स्पर्धा आहे, ही शिवाजी महाराजांची वरात आहे आणि चक्रव्यूह आहे. तर यावरून वाटत नाही का की कोणत्याही व्यक्तीनं ड्रग्स टेस्ट व्हायला हवी? मला तर वाटतं की टेस्ट झालीच पाहिजे. एकतर ते मद्यपान करत नशेत ड्रग्सच्या नशेत आहेत. खरंतर कोणती व्यक्ती शुद्धीत असं काही बोलेल का?'


लोकसभेत राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहशी 'यूनियन बजेट'ची तुलना केली होती. त्यात अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये अडकवून त्याला मारण्यात आलं होतं. 


हेही वाचा : अभिनेता अर्जुनचा गोव्यात भीषण अपघात! पायाला गंभीर दुखापत, पाहा फोटो


दरम्यान, या आधी कंगनानं शनिवारी 27 जुलै रोजी पॅरिस ओलम्पिक 2024 च्या ओपनिंग कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. तिनं या ओपनिंग कार्यक्रमाला खूप जास्त कामुक असल्याचं म्हटलं. कंगनानं म्हटलं की त्यात अश्लीलता दाखवण्यात आली.