Kangana Ranaut On Bhramastra: अभिनेत्या रणबीर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी गूडन्यूज सांगितल्यावर चाहत्यांमध्ये एकच आनंद आहेत.आता आलिया-रणबीरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याची चाहुल ऐकू येणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघांनी खूप मेहनत घेतली. अशातच जन्माला येण्यापूर्वीच आलिया-रणबीरच्या बाळावर (Alia-Ranbir Baby) एका बॉलिवूड अभिनेत्रीने जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर (social media) तिने आपल्या संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) आहे. तिने पुन्हा एकदा आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र'(Bhramastra) चित्रपटावर टीका केली आहे. या चित्रपटाबाबत कंगनाने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. कंगनाने 'ब्रह्मास्त्र'चा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा (Aayan Mukherjee) खरपूस समाचार घेत तिला जीनियस म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.


'ब्रह्मास्त्र'वरुन कंगना राणौत संतापली


कंगना रणौतने करण जोहर आणि आलिया भट्ट-रणबीर कपूरवरही एकत्र टीका केली. ब्रह्मास्त्रला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्यावर कंगनाने चित्रपट निर्मात्यावर 'खोटे' विकल्याचा आरोप केला. ती म्हणाला की, बॉलीवूडमध्ये असा एक वर्ग आहे जो आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. एवढचं नाही तर कमाल आर खान यांना अटक करा, असा सल्लाही कंगनाने दिला आहे. (kangana ranaut says ranbir alia baby was pr and bhramastra flop movie Entertainment News)




कंगनाने चित्रपटाच्या नकारात्मक रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, 'जेव्हा तुम्ही खोटे बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे होते. करण जोहर लोकांना प्रत्येक शोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीरला सर्वोत्कृष्ट कलाकार आणि अयान मुखर्जीला प्रतिभावान म्हणायला भाग पाडतो.त्यांचा हळूहळू या खोट्यावर विश्वास बसू लागला.


''फॉक्स स्टुडिओला स्वतःला विकावं लागले''


ती पुढे म्हणते की, 'यावरुन हे सिद्ध होतं की, चित्रपटासाठी 600 कोटी खर्च करून या दिग्दर्शकाने आपल्या आयुष्यात कधीही चांगला चित्रपट बनवला नाही. या चित्रपटासाठी पैसे गुंतवण्यासाठी भारतातील फॉक्स स्टुडिओला स्वतःला विकावं लागले आणि या जोकरमुळे किती स्टुडिओ बंद होतील?'



कंगनाने आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नावर भाष्य केलं आणि 'ब्रह्मास्त्र' रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वी आई-वडील होण्याच्या त्यांच्या घोषणेबद्दल बोलले. केआरकेच्या अटकेसाठी त्याने बॉलीवूडमध्ये 'गटबाजी'चा आरोप केला. ती म्हणते की, 'बेबी PRपासून लग्नापर्यंत, मीडियावर नियंत्रण ठेवले, केआरकेला तुरुंगात टाकले, रिव्ह्यू घेतले, तिकिटे विकत घेतले. ते सर्व अप्रामाणिकपणा करू शकतात पण एक चांगला प्रामाणिक चित्रपट बनवू शकत नाहीत.


''धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न''


कंगनाने तिच्या पुढच्या पोस्टमध्ये 'ब्रह्मास्त्र'साठी अयान मुखर्जीला जीनियस म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकावे आणि लिहिले आहे की, 'अयान मुखर्जीला जीनियस म्हणणाऱ्या प्रत्येकाला ताबडतोब तुरुंगात पाठवले पाहिजे' 600 कोटी जळून खाक झाले. धार्मिक भावना दुखावण्याचाही प्रयत्न झाला. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीझन 7' या चॅट शोचा संदर्भ देत ती म्हणाली की, 'करण जोहरसारख्या लोकांना त्यांच्या वागणुकीबद्दल चौकशी केली पाहिजे. त्याला त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिप्टपेक्षा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त रस असतो. तो वादग्रस्त खुलाशांसाठी ओळखला जातो.