मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कंगना रानावत सोशल मीडियावर चर्चेत आहे. आप की अदालत ला दिलेल्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा ते सर्व विषय समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता कंगनाचे काही फोटो देखील चर्चेत आले आहेत. कंगना मेहबुब स्टुडिओत दिसली. तेव्हाचे तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. कंगना आपला आगामी सिनेमा सिमरनसाठी मेहबुब स्टुडिओत आली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावेळी कंगना एका व्यक्तीच्या मांडीवर बसली असल्याचे फोटो देखील दिसत आहे. आणि या फोटोत कंगना आणि ती व्यक्ती दोघेही हसताना दिसत आहेत. पण ही व्यक्ती नेमकं कोण आहे हे मात्र अद्याप कळलेलं नाही. 


आपल्याला माहितच आहे, कंगना आणि हृतिकच्या अफेरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून अगदी हॉट टॉपिकवर आहे. सगळीकडे यावरच बोललं जातं आहे. असं असताना कंगनाचा हा फोटो देखील व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे कंगनाचा हटके अंदाज देखील आपल्याला दिसत आहे. 



कंगनाच्या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा कंगना - हृतिक, कंगना - आदित्य पंचोली आणि कंगना - शेअर सुमनचा मुलगा ही नावे चर्चेत आली आहेत. कंगनाने कायमच आपलं वेगळेपण जपलं आहे मग ते सिनेमात असो वा खाजगी आयुष्यात. कंगनाचा 'सिमरन' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.