मुंबई : बॉलिवूडविश्वात देखील कोरोना डोकंवर काढत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. आता बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रानौत देखील कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली. छोटा फ्लू आहे, नष्ट करून टाकेल... असं तिने पोस्ट केलं आहे. शिवाय कंगनाने स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो पोस्ट करत कंगनाने कॅप्शनमध्ये, 'गेल्या काही दिवसांपासून थकवा जाणवत होता. म्हणून हिमाचलला जाण्याचा विचार करत होती. त्याआधी कोरोना चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे स्वतःला घरीचं आयसोलेट केलं आहे. मला काहीचं कल्पना नव्हती व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करेल. पण आता मला माहित पडलं आहे. मी व्हायरसला नष्ट करेल..'


कंगना पुढे म्हणाली, 'कोणालाही आपल्यावर वर्चस्व गाजवू देवू नका. जर तुम्ही घाबरलात, तर तो तुम्हाला जास्त घाबरवेल. आता कोरोनाला नष्ट करण्याची वेळ आली आहे..' असं कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे.