Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगा क्विन ही कायमच कोणा ना कोणाशी तरी पंगा घेत असते हे आपण कायमच ऐकत असतो. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की मध्यंतरी आलिया भट्ट हिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तिच्या जनरल नॉलेजवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येयचे आता कंगनानं आलियाचा हाच मुद्दा परक उचलून तिच्यावर निशाणा साधाला आहे. चला तर पाहुया की आता यावेळी नक्की कंगनानं आलियावर निशाणा का साधला आहे? यावर्षी कंगना आणि आलियामध्येही स्पर्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाचेही यावेळी मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सोबतच तिला यंदा राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान झाले आहेत. त्यातून कंगनाचेही तीन मोठे चित्रपट सरत्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे तिचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 'तेजस', 'चंद्रमुखी 2', 'इमरजन्सी' असे तीन चित्रपट तिचे प्रदर्शिनाच्या मार्गावर आहेत. 


कंगना ही कायमच राजकीय आणि सामजिक मुद्द्यावर बोलताना दिसते. मागील वर्षी तिनं '2014 ला खरं स्वातंत्र्य मिळालं' असं विधान केले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. तिच्यावर अनेकांकडून टीकाही झाली होती. किंबहूना तिच्या या वक्तव्यानं स्वातंत्र्य चळवळीतील अनेक स्वातंत्र्यवीरांच्या परिवारांनी यावर टीका केली होती. त्यांच्या भावनाही दुखावल्या गेल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी आता पुन्हा एकदा एका ट्विटच्या माध्यमातून पुन्हा तिनं एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे कंगनावर पुन्हा एकदा हेटर्सनी निशाणा साधला आहे. यावेळी तिनं मात्र आपल्यावरील टीका सहन झाली नाही म्हणून चक्क आलियावरच निशाणा साधला आहे. नक्की हे ट्विट काय आहे आपण हे पाहुया. 


हेहा वाचा : दुबईच्या वाळवंटात धडपडली मिताली, मदत करायची सोडून सिद्धार्थ उडवली खिल्ली


यावेळी सोशल मीडियावर एक ट्विट फिरत आहे ज्यात कंगना राणावत असं म्हणते की 2014 च्या आधी आम्हाला राष्ट्रपतींची नावंही माहिती नव्हती. त्यावर एका युझरनं तिला ट्रोल करत म्हटलं आहे की, बरोबर, हिच्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकतो? ती कायमचं आपलं कमी ज्ञान पाजळत राहिली आहेत. या ट्रोलर्सला उत्तर देत ती म्हणाली की, मॅडम हा तर पॉप कल्चर शॉक आहे. एक मोठी अभिनेत्री तर चक्क पृथ्वीराज चौहन हे आपले तेव्हाचे राष्ट्रपती होते असं म्हणाले. तुम्हाला कदाचित आठवत नसेल परंतु तसा मुर्खपणा तर कोणीच विसरू शकत नाही जो कॉफी विथ करणमध्ये घडला होता.