मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच 'धाकड' चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीने या आगामी चित्रपटाचं प्रमोशनही सुरू केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर पहिलं गाणं रिलीज होणार आहे. यापूर्वी अभिनेत्रीने शी इज ऑन फायर या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये कंगना राणौतचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये कंगनाची बोल्ड स्टाइल
या गाण्याचा टीझर कंगनाने इंस्टाग्रामवर रिलीज केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गाण्याचा हा बोल्ड टीझर व्हिडिओ आणि त्यात कंगनाची स्टाईल पाहिल्यानंतर आता या संपूर्ण गाण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.


बादशाहने गाणं गायलं
शी इज ऑन फायर या गाण्याला बादशाहने आवाज दिला आहे. या गाण्यात कंगना रणौत व्यतिरिक्त अर्जुन रामपाल देखील दिसणार आहे. या गाण्यात कंगना राणौतचे अनेक अवतार तुम्हाला पाहायला मिळतील. टीझर शेअर करत कंगनाने लिहिलं की, 'आग इतकी भीषण आहे की अग्निशमन दलही ती विझवू शकत नाही!'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'धाकड' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यामध्ये कंगनाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. बंदूक चालवण्यापासून ते खलनायकाशी लढण्यापर्यंत ती या चित्रपटात दिसणार आहे. रजनीश घई या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात कंगना रणौतशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता दिसणार आहेत. हा चित्रपट २४ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.