जेव्हा अमिताभ यांच्या अफेअरसंबंधी प्रश्न विचारताच संतापले त्यांचे सासरे, म्हणाले 'येथे माझी...'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा उल्लेख होतो.1973 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले आणि यानंतर त्यांच्यांसह त्यांच्या कुटुंबाचंही आयुष्यच बदललं.  

| Sep 24, 2024, 18:55 PM IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा उल्लेख होतो.1973 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले आणि यानंतर त्यांच्यांसह त्यांच्या कुटुंबाचंही आयुष्यच बदललं.

 

1/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा उल्लेख होतो.1973 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले आणि यानंतर त्यांच्यांसह त्यांच्या कुटुंबाचंही आयुष्यच बदललं.  

2/9

जया बच्चन यांचे वडील तरुण कुमार भादुडी एक पत्रकार होते. 1989 मध्ये त्यांनी इलस्ट्रेचेड वीकलीमध्ये एक लेख लिहून आपल्या मुलीचं अमिताभ यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं बदललं यावर भाष्य केलं होतं.   

3/9

तरुण यांनी सांगितलं की, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अमिताभ यांचे सासू-सासरे म्हणून लोक ओळखू लागले. त्यांचं शांत आयुष्य लोकांसाठी मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं होतं.   

4/9

तरुण यांनी हेदेखील सांगितलं होतं की, कशाप्रकारे मुलीच्या लग्नानंतर त्यांचे जुने मित्र त्यांच्याशी आणि त्यांच्या पत्नीशी जास्त फ्रेंडली झाले होते. तसंच अनोळखी त्यांच्याशी मैत्री करु इच्छित होते.   

5/9

आपल्याला अनेक आमंत्रणं मिळत होती. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला वेगवेगळ्या क्लब्सच्या उद्घाटनांना बोलावलं जात होतं. त्यांना सर्व ठिकाणी आमंत्रण असायचं.   

6/9

हे सर्व होण्यामागे ते अमिताभ यांचे सासू-सासरे आहेत हे एकमेक कारण होतं. याच्यात त्याचं स्वत:चं असं काहीच यश नव्हतं. आपल्याला एक पत्रकार म्हणून हे आवडत नव्हतं. पण वडील म्हणून चांगली भावना होती असं ते म्हणाले.   

7/9

पण एक वेळ अशी होती जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. तरुण यांनी सांगितलं की, एका महिला संघटनेने त्यांना अमिताभ यांच्या अफेअर्सवर बोलण्यासाठी बोलावलं होतं.   

8/9

ते म्हणाले की, "मला अमिताभ यांच्या अफेअर्सवर बोलण्यासाठी बोलावलं होतं. यामुळे मला प्रचंड राग आला होता. मी त्यांना म्हणालो, मला स्वत:चे अफेअर सांभाळणं जमत नसताना त्याच्या अफेअर्सवर काय बोलणार".   

9/9

अनेक अडथळे आल्यानंतरही आणि सतत लोकांच्या नजरेत असतानाही जया बच्चन आणि अमिताभ आजही एकमेकांसोबत आहेत. त्यांना श्वेता आणि अभिषेक अशी दोन मुलं आहेत जी आज यशस्वी आहेत.