मुंबई : आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी बॉलिवूडची क्वीन आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना कबड्डीवर आधारित सिनेमात एक खास भूमिका साकारणार आहे. यात ती पहिल्यांचा आईची भूमिका साकारणार आहे.


चाहत्यांना आश्चर्याचा धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना आतापर्यंत बोल्ड आणि दमदार भूमिका केल्या आहेत. पण पहिल्यांदाच आईची भूमिका स्वीकारून तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. बरेली की बर्फी सिनेमाच्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी या सिनेमाची निर्मिती करणार आहे.


अशी असेल भूमिका


या सिनेमात कंगणा कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसेल. सिनेमात कॉलेज गर्ल ते विवाहिता आणि नंतर आई असा कंगनाच्या भूमिकेचा प्रवास आहे. मात्र आईची भूमिका साकारण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे.


कंगनासोबत असणार हा अभिनेता


सध्या कंगना 'मेंटल है क्या' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती या सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज होईल. ही भूमिका अतिशय कठीण असून कंगना यातही उत्तम अभिनय करण्याच्या तयारीत आहे.  
या सिनेमात तिच्यासोबत सुमीत व्यास असेल. अलिकडेच 'वीरे दी वेडींग' सिनेमात करिनासोबत त्याने काम केले होते.