मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानाचे स्वत:च समर्थन केले. 'पाकिस्तान का विनाश' असे वक्तव्य कंगनाकडून करण्यात आले होते. पुलवामा दहशवादी हल्ल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना कंगनाने आपण रागाच्या भरात हे वक्तव्य केले असल्याचे सांगितले. त्या विधानाचे समर्थन करताना ही एक स्वभाविक भावना असल्याचे तिचे म्हणणे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० वीर जवानांना आपल्या प्रणाची आहुती द्यावी लागली होती. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर फक्त निर्बंध लादणे योग्य नाही तर, पाकिस्तानचा नाश हाच एकच पर्याय असल्याचे कंगनाने सांगितले. 


कंगना म्हणाली, 'माझ्या मते ही एक स्वभाविक भावना आहे. जी मला त्या क्षणी वाटत होती. ज्या वेळेस आपल्या सर्वांच्या कानावर ही धक्ककादायक बातमी आली तेव्हा ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी होती. ही घटना कधीही न विसरता येणारी आहे. अशा वेळी काणताही विचार न करता मी हे विधान केले. पण ही एक स्वभाविक भावना आहे.'


पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वायुदलाकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण समर्थन करत आहेत. सोशल मीडियावरही या विषयीच्या बऱ्याच चर्चा रंगत आहेत.