अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनानं धरला ठेका
अर्णब गोस्वामी यांना ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई : इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. अखेर ८ दिवसांनंतर अर्णब यांना जामीन मंजुर झाला आहे. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत १८ नोव्हेंबर रोजी संपणार होती. मात्र सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांचा जामीन मंजुर केला.
दरम्यान, अर्णब गोस्वामी कारागृहातून बाहेर येताच सोशल मीडियावर #ArnabIsBack हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रानौतने देखील आनंद झाला असल्याचं सांगत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत 'आवो जी पधारो मारो देश..' या गाण्यावर ठेका धरला आहे.
सध्या तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'आजचा दिवस माझ्या कुटुंबासाठी फार खास असल्याचं सांगत तिने वेलकम बॅक माय डियर फ्रेंड असं देखील लिहिलं आहे.
काय आहे अर्णब गोस्वामी प्रकरण?
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.