मुंबई : २०२० हे वर्ष सिनेसृष्टीसाठी चांगल वर्ष ठरताना दिसत नाही. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच निधन झालं. आता साऊथ इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेता चिरंजीवी सारजा यांच वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झालं आहे. ७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचं निधन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अभिनेत्याला श्वसनाचा त्रास होता. त्यांना बंगलुरूच्या जयनगरमध्ये असलेल्या एका खासगी रूग्णालात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चिरंजीवी सारजा यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. 



चिरंजीवी यांच लग्न झालं असून त्यांच्या पत्नीचं नाव मेघना राज असं आहे. अभिनेता ध्रुव सारजाचे चिरंजीवी मोठे भाऊ होते. तर साऊथ इंडस्ट्रीतील ऍक्शन किंग अर्जून सारजाचे भाचे होते. तर कन्नड सिनेमातील दिग्गज अभिनेता शक्ती प्रसाद हे त्यांचे आजोबा होते. 


चिरंजीवी यांनी २००९ मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांमध्ये काम केले आहे. १२ मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा अखेरचा चित्रपट ठरला आहे.


 



चिरंजीवी यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीवर मोठी शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी भारतीय क्रिकेटर अनिल कुंबळे यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.