बंगळुरु : एका कन्नड टीव्ही अभिनेत्री आणि अभिनेत्या बंगळुरुजवळ झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला आहे. कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर कारमधील इतर कलाकार जखमी झाले आहेत.


सहकलाकाराच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र निघाले होते. रचना, जीवन आणि इतर काही टीव्ही कलाकार गुरुवारी मध्यरात्री सुब्रमण्य गावातील एका मंदिरात चालले होते. त्यावेळी मगदीजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकवर त्यांची कार आदळली. अपघाताच्या वेळी अभिनेता जीवन स्वतः कार चालवत होता. 


अपघातात अभिनेत्री रचना आणि अभिनेता जीवन यांचा मृत्यू झाला, तर रणजित, एरिक, होनेश आणि उत्तम यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अभिनेत्री रचनाने महानदी, मधुबाला, त्रिवेणी संगम यासारख्या काही मालिकांमध्ये अभिनय केला आहे.