Kantara Box Office Collection : कन्नड नंतर हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये कांतारा (Kantara Movie) हा दक्षिणात्य सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट 100 कोटींच्या (100 crore club) क्लबमध्ये सामील झाला आहे. कांतारा सिनेमाने अवघ्या 18 दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार केलाय. बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office collection) कमी पडत असताना, दक्षिणेकडील चित्रपट धमाकेदार कमाई करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट कांतारने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाची धमाकेदार कमाई पाहून कांतारा लवकरच 200 कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकतो असं सिनेविश्लेषकांचा अंदाज आहे.


सिनेमा 4 भाषांमध्ये रिलीज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा तिसऱ्या आठवड्यातही पूर्ण वेगाने घौडदोड करत आहे. आधी फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेला सिनेमा नंतर अफाट यश पाहून तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही डब करण्यात आला. इतर भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर कांताराच्या कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाची कन्नड आवृत्ती ब्लॉकबस्टर ठरली आणि आता इतर भाषांमध्येही या चित्रपटाने आपली चुणूक दाखवली आहे. कांताराने 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. (Kantara Collection Updates)


कांताराचं बजेट फक्त 20 कोटी (Kantara Movie Budget)


कांताराने जगभरात 140 कोटींहून अधिक कमाई केली आहे. कांताराच्या 18व्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आकडे पुढे आलेत. ज्यामध्ये चित्रपटाने भारतात 121 कोटी निव्वळ (सर्व भाषा) किंवा 142.78 कोटी कमावले आहेत. परदेशात, चित्रपटाने आतापर्यंत 10.50 कोटींची कमाई केली असून एकूण 153.28 कोटींची कमाई केली आहे. केवळ 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या कन्नड चित्रपटासाठी ही अभूतपूर्व कामगिरी मानली जाते. येत्या काही दिवसांत कांतारा 200 कोटींपर्यंत कमाई करेल असा अंदाज आहे.


ऋषभ शेट्टीची निर्मिती


कांतारा (Kantara) हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीनेही (Rushabh Shetty) मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटात शेट्टी हा कंबाला चॅम्पियन म्हणून दाखवण्यात आला आहे. साऊथ स्टार प्रभास, धनुष आणि अनुष्का शेट्टी यांनी देखील या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे.