मुंबई : कांतारा'..... सध्या कलाजगतामध्ये याच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रटातील कलाकारांपासून ते अगदी त्यातील गाणी आणि कथानकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. 2022 मध्ये बोलबोला होता तो म्हणजे 'कांतारा' सिनेमाचा.मात्र या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांतारामध्ये  पोलिस फॉरेस्ट ऑफिसर मुरलीधरची भूमिका साकारणाऱ्या किशोरचं ट्विटर अकांऊन्ट सस्पेंड करण्यात आलं आहे. त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे की, त्याने ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. बातमी समोर आल्यानंतर फॅन्स किशोरचं ट्विटर अकांऊन्ट सस्पेंड होण्यामागचं कारण जाणू ईच्छितात.  मात्र आता पर्यंत हे स्पष्ट झालं नाहीये की, त्याचं अकांऊन्ट का आणि केव्हा सस्पेंड झालं आहे. एवढंच नव्हेतर काही फॅन्सने ट्विटरचे  CEO एलन मस्क यांना टॅग करत किशोरचं अकांऊन्ट रिस्टोर करण्याची मागणी केली आहे.


एका युजरने ट्विट करत लिहिलं आहे की,  प्रिय इलॉन मस्क अभिनेते किशोरचं ट्विटर अकाऊंट का सस्पेंड केलं गेलं? तर दुसऱ्या युजरने लिहिलं,  किशोर जी यांचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे, ही ट्विटरची मोठी लापरवाही आहे, ते कर्नाटकातील शेतकऱ्यांचा आवाज आहेत. सरकारला प्रश्नचिन्ह लावल्याने आता ट्विटर अकाऊंट सस्पेंड होणार का? अॅलन मस्क तुम्ही हा मुद्दा पाहिलाच पाहिजे. अकाऊंट सस्पेंड केल्यापासून किशोरचे चाहते त्याचे अकाऊंट रिकव्हर करण्याची मागणी सोशल मीडियावर करत आहेत. 



बिंधास्त अंदाजासाठी ओळखवला जातो किशोर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सई पल्लवीच्या वादग्रस्त विधानाचं किशोरने समर्थन केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्येचा संबंध मुस्लिमांच्या हत्यांशी जोडला. याशिवाय किशोरने पलटवार करत म्हटलं की, 'चित्रपट कलाकारांनी सामाजिक विषयांवर मत व्यक्त करणं गुन्हा आहे का?'


त्यानंतर त्याचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं. मात्र, किशोरने अद्याप त्याचं ट्विटर अकांऊन्ट सस्पेंण्ड करण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नुकतंच किशोरने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने टीव्ही चॅनलकडे लक्ष ईशारा करत ३० नोव्हेंबर हा स्वातंत्र्य प्रेस आणि भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असं म्हटलं होतं.