Kantara Movie : `कांतारा`ची `लीला` खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!
`लीला` (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं
Kantara Movie : ऋषभ शेट्टी (Rishabh shetty) लिखीत आणि दिग्दर्शित 'कांतारा' या चित्रपटानं सध्या बॉलिवूडकरांच्या मनातही भीती निर्माण केली आहेत. जितकं स्थानिक, तितकं वैश्विक अशा निकषावर काम करणाऱ्या ऋषभनं त्याच्या या चित्रपटातच मध्यवर्ती भूमिकाही साकारली. 'शिवा'ची दमदार भूमिका साकारण्यासाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतली. दैवाचा शरीरात संचार झाल्यानंतर होणारे बदल पडद्यावर मांडण्यासाठी त्यानं आहाराच्या सवयी बदलण्यापर्यंत मजल मारली. तिथे ऋषभच्या भूमिकेला प्रेक्षकपसंती मिळत असतानाच इथे या चित्रपटातील 'लीला'सुद्धा नजरा वळवत आहे.
गहूवर्णीय 'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं. या अभिनेत्रीचं नाव, सप्तमी गौडा (Saptami Gowda). सप्तमीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फेरफटका मारल्यास तिचे असे काही फोटो नजरेसमोर येतात जे पाहून तुम्ही स्वत:लाही विसराल.
अधिक वाचा : Kantara पाहिला असेल, तरच वाचा ही बातमी; सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
साडीमध्ये खुलून आलेलं तिचं सौंदर्य म्हणजे क्या बात! Kantara मुळे प्रकाशझोतात आलेल्या याच सप्तमीला सुरुवातीला या चित्रपटाचं नावही ठाऊक नव्हतं. पण, ही संधी कायमच आपल्या मनाच्या जवळ असेल असंच सप्तमी म्हणते. आपल्याला मिळालेल्या या भूमिकेबद्दल तिनं एका पोस्टच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एकिकडे आपल्या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे सध्या आनंदाच्या शिखरावर असणारी सप्तमी दुसरीकडे तिच्या रुपानं सातत्यानं नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. तिचे Black and White photo पाहून हे तुमच्याही लक्षात येईलच.
'कांतारा'विषयी थोडं...
15 कोटींचा निर्मिती खर्च, 250 कोटींची कमाई, या कमाईचा वाढता आकडा आणि आपल्या माणसांची साथ या साऱ्याच्या बळावर Rishabh shetty दिग्दर्शित Kantara चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला, काहींचा थरकापही उडवला. या चित्रपटाचे असंख्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत. पण, ते पाहण्याऐवजी उत्सुकता असल्यास तुम्ही चित्रपट पाहणंच उत्तम.