kantara vs Tumbbad :  ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने स्वत:चा एक फॅन बेस तयार केला आहे. या चित्रपटातील कहानी पाहून अनेकांनी या सिनेमाची तुलना तुंबाड या सिनेमाशी करायला सुरूवात केली आहे. ही तुलना पाहून आता 'तुंबाड'च्या (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टरने 'कांतारा'वर टीका करणारे ट्विट केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad)  अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”  त्यांच्या या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर या दोघांपैकी कोणता चित्रपट चांगला आहे, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे.


आनंदच्या (Anand gandhi) ट्विटला प्रत्युत्तर देताना सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये आता 'कांतारा' (Kantara) आणि 'तुंबाड'मध्ये (Tumbbad) कोणता चित्रपट चांगला आहे, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत एका यूजरने लिहिले की, 'तुलना करण्याचे कारण नाही. कांतारा संस्कृती स्वीकारतो आणि साजरा करतो. तुंबाड तसे अजिबात नाही. छान सिनेमॅटिक अनुभव, परंतु तुंबाडच्या शेवटी काहीही चांगले वाटले नाही. याशिवाय अनेक यूजर्सनी असेही सांगितले की, 'कंतारा' मध्ये जंगल आणि तिथले लोक यांच्यातील नाते देखील दिसून येते.


'तुंबाड'वरून श्रेय वाद


आनंद गांधी (Anand gandhi) यांच्या ट्विटला उत्तर देताना आणखी एक वाद सुरू झाला आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग' आणि 'मर्द को दर्द नहीं होता'चे दिग्दर्शक वासन बाला (Vasan Bala) यांनी 'तुंबाड' दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांची आयडिया सांगितली. 


बालाने (Vasan Bala) लिहिले, 'तुंबाड राहीची कल्पना होती... याशिवाय, हो मी तुमच्याशी सहमत आहे.' बालाला उत्तर देताना आनंद म्हणाला, 'तू माझ्या चित्रपटाच्या सेटवर उपस्थित नव्हतास', पण बालाही आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. त्याने कबूल केले की तो 'तुंबाड'च्या सेटवर उपस्थित नव्हता, पण तो कशाबद्दल बोलत आहे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे.


दरम्यान 'कांतारा' (Kantara) बद्दल बोलायचे झाले तर, ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) चित्रपटाने 8 आठवड्यांत एकट्या भारतात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरातील चित्रपटाच्या कमाईने 400 कोटींचा आकडा पार केला आहे.