मुंबई :  प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्त्री आसते. त्या स्त्रीची साथ आणि असलेल्या विश्वासामुळे एका पुरूषाला यश प्राप्त होतं. अभिनेता आणि कॉमेडी किंग कपिल शर्माच्या आयुष्यात देखील एक मुलगी होती, जिच्यामुळे आपल्याला विनोदवीर कपिल शर्मा भेटला. कपिलच्या यशामागे फक्त त्याची मेहनत आणि चिकाटी नाही तर त्याची कॉलेजमधील एक मैत्रीण आहे. कपिल शर्माला गाण्यात रस होता. स्टेज, अभिनयापासून तो कोसो दूर होता. 'जिंदगी लाइव्ह'शोच्या माध्यमातून कपिलने त्याचा अभिनयाचा प्रवास सांगितला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुला अभिनय आणि कॉमेडीमध्ये आवड काशी निर्माण झाली, तेव्हा कपिल म्हणाला, 'अभिनय क्षेत्रात पाय ठेवेल असं मला कधीचं वाटलं नाही. माझे मित्र नाटकात काम करायचे त्यांच्यासोबत एक मैत्रिण देखील होती. तेव्हा ती मुलगी मला फार आवडली आणि मी नाटकात काम करण्याचा विचार केला. एक मित्र मला सरांकडे घेवून गेला.'


'तेव्हा त्या सरांनी मला दारू प्यायलेल्या व्यक्तीची भूमिका करण्यास सांगितले. तेव्हा त्यांना माझं अभिनय फार आवडलं. त्यांनी त्या मित्राचा रोल देखील मलाचं दिला. त्यानंतर तो मित्र मला आजही भेटलेला नाही. तेव्हा मी पहिल्यांदा नाटकात काम केलं.' अशा प्रकारे फक्त त्या एका मुलीमुळे कपिलला त्याच्या जीवनाचा मार्ग सापडला. 


महत्त्वाचं म्हणजे, कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आता कपिल नव्या अंदाजासह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.