नवी दिल्ली: कपिल शर्मा आणि त्याचे फॅन्स यांच्यासाठी अलीकडेच एक चांगली बातमी आली होती. ती म्हणजे 'द कपिल शर्मा शो' चे सोनी टीव्ही बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट १ वर्ष वाढवले आहे. त्याचबरोबर कपिलने त्याच्या फॅन्ससाठी अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. बातमी त्याच्या आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दल असून कपिलने त्याबद्दल ट्विट करून खुलासा केला आहे.  
चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार:
चित्रपटाची प्रदर्शित तारखेबद्दल कपिलने ट्विट केले की, '' मला हे सांगताना आनंद होत आहे की, फिरंगी हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी १० नोव्हेंबर २०१७ ही तारीख नक्की झाली आहे. कपिलच्या या चित्रपटात त्याच्यासोबत इशिका दत्ता आणि मोनिका गिल या दोन अभिनेत्री आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याबरोबर अशी बातमी आली आहे की, कपिल शर्मा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपला नवीन शो सुरु करणार असून त्यात त्याची स्टँडअप कॉमेडी पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या या शो संदर्भात फ्लिक्स इंडियाची भेट घेतली आहे. त्याचबरोबर अमेजन आणि हॉट स्टारशी देखील भेटीगाठी चालू आहेत.