मुंबई : कपिल शर्माने पुन्हा एकदा स्वत:कडे वाद ओढवून घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईमध्ये कपिलने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)च्या तिसऱ्या सीझनच्या लॉंचिंग सोहळ्यात परफॉर्म केला.


यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातयं  कपिलच्या या परफॉर्मन्समुळे  भारतातील त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झाले आहेत.


तसेच कपिलच्या या परफॉर्मन्सला शिवसेना आणि मनसेकडूनही विरोध केला जातोय. 



शिवसेनेचा रोष


'कपिल शर्मा भारताच्या सन्मानाची खिल्ली उडवतोय. त्याला फक्त पैसे कमवायचे आहेत. आपल्या देशाची काळजी त्याला नसल्याचे' शिवसेने सांगितल्याचे वृत्त इंडिया.कॉमने दिले आहे.



मनसे नाराज



मनसे प्रवक्ता अमेय खोपकर यांनीदेखील या प्रकरणी कडक भूमिका घेतली. 'कपिलला स्वत:ची लाज वाटली पाहीजे. पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी आणली गेली.


तरीही त्याने त्यांच्यासाठी कार्यक्रम केला. मी त्याचा चाहता होतो. पण आता त्याचे कार्यक्रम कधी बघणार नाही. सर्वांनाही मी हेच सांगेन', असे खोपकर यांनी सांगितले.