डिप्रेशन नाही तर हे आहे कपिलचा शो बंद होण्याचे कारण...
कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वादात अडकला आहे.
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वादात अडकला आहे. त्याच्या कॉन्ट्रावर्सीज संपण्याचे नाव घेत नाहीत आणि त्यातच भर म्हणून की काय त्याचा नुकताच सुरु झालेला शो फॅमेली टाईम विथ कपिल शर्मा आता बंद करण्यात आला आहे. कपिलच्या या शोचे ३ एपिसोड्सच झाले आणि लगेच शो बंद करण्यात आला. कपिल शर्माच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल जे काही करत आहे त्याची पूर्ण माहिती त्याला असल्याचे म्हटले जात आहे.
कपिल म्हणतो...
जे कोणी माझे करिअर बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी माझ्याबद्दल कितीही अफवा पसरवा. त्याने मला काही फरक पडत नाही. असे माझ्यासोबत पहिल्यांदाच होत नाही आहे. यापूर्वीही माझ्या यशावर अनेकजण जळत होते. मला माहित आहे की, मी काय करत आहे आणि यात सोनी चॅनल माझी साथ देत आहे. मला सोनी कडून पूर्ण पाठींबा मिळत आहे, असे कपिलच्या सुत्रांकडून समजतेय.
हे आहे शो बंद होण्याचे कारण
रिपोर्टनुसार, कपिलचा शो बंद केला गेला नाही तर शो च्या थिमवर पुर्नविचार करण्यात येत आहे. कपिल स्वतः या शो मुळे खूश नसून त्यालाही शो मध्ये कशाची तरी कमतरता जाणवत होती. त्यामुळे कपिलचा हा शो प्रेक्षकांसाठी फारसा इंटरेस्टिंग ठरला नाही. आणि म्हणूनच या शो वर पुन्हा एकदा काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.