मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माकरता गेले वर्ष हे भरपूर चढ - उतारांच होतं. कॉमेडी नाइट विथ कपिलच्या यशानंतर द कपिल शर्मा शो आणि फॅमिली टाइम विथ कपिल या दोन शोकडे मात्र प्रेक्षकांनी नाकारलं. एवढंच काय तर कपिल शर्माचा कधी त्याच्या को-स्टारसोबत तर कधी मीडियासोबत वाद झाला. यासगळ्या गोष्टींमुळे कपिल अनेकदा चर्चेत राहिला. हे कमी होतं की काय म्हणून कपिल शर्माची तब्बेत बिघडली असल्याचं देखील समोर आलं. सध्या तो मुंबईच्या बाहेर आराम घेत आहे. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. आणि तो लवकरच धमाकेदार वापसी करण्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा मुंबई एअरपोर्टवर दिसला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोत कपिल भरपूर जाडा झाल्याचं दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की कपिल शर्मा लवकरच धमाकेदार एन्ट्री करणार आहे. 



असं म्हटलं जातं की, कपिल आता स्वतःला पुरेसा वेळ दिला जात आहे. ज्यामार्फत तो लवकरच प्रेक्षकांमध्ये चांगली वापसी करणार आहे. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा सध्या आपल्या गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्या घालवत आहे. कपिल अजून काही दिवस ग्रीसमध्येच राहणार असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला की, आणखी काही वेळ स्वतःला देणार आहे. काही काळापासून मी फक्त कामच करत होतो. त्याचा परिणाम माझ्या शरिरावर झाला आहे. आता मला विश्रांतीची गरज आहे. पण मी माझ्या चाहत्यांसाटी नव्या प्रोजेक्ट्सचा विचार करत आहे. मात्र योग्यवेळ आल्यावर याचा खुलासा करेन.