मुंबई : कॉमेडी अभिनेता कपिल शर्माचा दुसरा चित्रपट फिरंगी हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. आता चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होईल. मात्र कपिल चित्रपटाचे प्रमोशन छोट्या पडद्यावर करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. टीव्हीऐवजी तो प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्यावर अधिक भर देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शो मध्ये यायचे. आता त्याचा शो बंद झाल्याने तो प्रमोशनसाठी कोणत्या कार्यक्रमात जाणार, हा प्रश्न त्याला पडला आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 


या चित्रपटात कपिलसोबत ईशिता दत्ता आणि मोनिका गिल झळकणार आहेत. इतकंच नाही तर नेहमी विनोदाची फटकेबाजी करणारा कपिल या सिनेमात एक गाणंही गायला आहे. तेव्हा आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना अत्यंत उत्सुकता आहे. कपिल शर्माचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर फारशी जादू करु शकला नव्हता. पण, ‘फिरंगी’कडून फक्त कपिललाच नाही तर प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत.