मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंब... कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं वर्चस्व प्रस्थपित केलं आहे.  सदस्यांची संख्या फार मोठी असल्यामुळे कुटुंबात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. कपूर कुटुंबातील फक्त सण नाही तर फॅमेली गेट-टू-गेदरचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील कपूर कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या फोटो मध्ये करीना कपूर खान, करिश्मा कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, रीमा जैन, निताशा नंदा, आदर जैन, अरमान जैन, अनीसा मल्होत्रा जैन आणि तारा सुतारिया देखील दिसत आहे. 


तारा सुतारिया लवकरच करीनाची वहिनी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तारा आणि आदर गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ती कपूर कुटुंबातील अनेक कार्यक्रमांमध्ये आदरसोबत दिसते. 



पण या फॅमिली फोटोमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर दिसत नाही.  आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. पण दोघांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. 


एवढंच नाही तर अलियाला रणबीरच्या बहिणी करीना आणि करिश्मासोबत अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. पण आता व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आलिया  नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.