मुंबई : सध्या सगळीकडेच साऊथ सिनेमांचा बोलबाला आहे. साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहेत. एवढंच नाही तर साऊथचे स्टार्सही लोकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण करत आहेत. त्याच बॉलीवूड चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. ज्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि आता चित्रपट निर्माता करण जोहरने यावर मौन सोडत विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहर म्हणाला की, 'त्याचा असा विश्वास आहे की, आता प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचणं हे एक आव्हान बनलं आहे. पण बॉलीवूड संपलं यावर त्याचा विश्वास बसत नाहीये. करण जोहर म्हणाला, 'ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. जेव्हा करण जोहरला विचारण्यात आलं की, बॉलिवूड संपलं आहे का? यावर त्याने उत्तर देत सांगितलं की, 'हा सगळा मूर्खपणा आहे. चांगले चित्रपट नेहमीच चालतात. 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'भूल भुलैया 2'ने खूप कमाई केली आहे. 'जुग जुग जिओ'ची कमाईही आपण पाहिली आहे. चांगले नसलेले चित्रपट कधीच चांगलं काम करू शकत नाहीत.


करण जोहर पुढे म्हणाला की, मला आशा आहे की आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खानचे आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतील आणि ते हिटही होतील. 'प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचणं आता इतकं सोपं नाही. तुमचा चित्रपट, ट्रेलर, प्रमोशन, सगळं काही चांगलं आहे की नाही यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल.  तुम्हाला तुमची सर्व शक्ती पणाला लावावी लागेल. हे एक आव्हान आहे आणि मला आव्हाने आवडतात.


करण जोहर आता 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट घेऊन येत आहे. तब्बल 6 वर्षांनंतर तो या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. इतकंच नाही तर चित्रपट निर्माता करण जोहर 'केस तो बनता है' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. जिथे अनेक स्टार्सना वकील रितेश देशमुखच्या मजेदार आरोपांना सामोरं जावं लागेल ज्याचा प्रोमो देखील इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.