Karan Johar : करण जोहर आपल्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. कधी तो नेपोटिझमवरून लोकांना उत्तर देतो नाहीतर त्याला कोणी ट्रोल केलं तर त्याला तो उत्तर देतो. सतत काही ना काही उत्तर देणारा करण जोहर आता पुन्हा एकदा त्याच्या नव्या स्टेटमेंटवरून चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करन जोहर हा सिंगल आणि अनमॅरिड असून तो गे आहे. तो जुळ्या मुलांचा पिताही आहे. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही लोकं त्याला टार्गेट करतात. 


करण जोहर हा त्याच्या 'कॉफी विथ करन' या शोमुळे भलताच लोकप्रिय आहे. त्याचा हा शो सध्या नव्या शिखरावर असून तो या शोमुळे घराघरात फेमस आहे. नुकताच त्याचा हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आहे. त्याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर आल्या होत्या तेव्हा त्या दोघींबद्दल बोलताना त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 


या दोघींना करणने फार चूकीची वागणूक दिली असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याने दोघीमध्ये भेदभाव केल्याचा आरोप आहे त्यामुळे तो चांगलाच ट्रोल झाला आहे. करणने त्याच्या शोमध्ये जान्हवीची जास्त बाजू घेतली आणि तिला सारा अली खानपेक्षा जास्त फेवर केले असं बोललं गेलं त्यामुळे नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लायगर' या ट्रेलर लॉन्चच्या वेळी खुद्द यावरून करणनेच खुलासा केला आहे. 


ट्रेलर लॉन्चच्या वेळी त्याला हा प्रश्न विचारण्यात आले की त्याने त्या दोघींमध्ये भेदभाव का केला तेव्हा करणने दिलेले उत्तर फारच धक्कादायक होते. तो म्हणाला, “हे पूर्णपणे खोटे आहे. जान्हवी ज्या गेममध्ये खेळत होती त्या गेममधील दोन फेऱ्या ती हरली होती म्हणून मला वाईट वाटलं होतं, म्हणून मी तिला मदत करण्याचा आणि तिला आनंद देण्याचा प्रयत्न करत होतो. 'बायस्ड' हा एक प्रश्न आहे जो या दोन मुलींच्या बाबतीत उद्भवू शकत नाही. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्या माझ्यासमोरच मोठ्या झाल्या आहेत आणि दोघेही माझ्या खूप जवळच्या आहेत. मी त्यांच्यावर तितकेच मनापासून प्रेम करतो. कोणतच भेदभाव करत नाही", असं करण म्हणाला. 


एकदंरीतच ट्रोलिंगवरही तो म्हणाला की, “मला हेटर्सचा कोणतीही प्रोब्लेम नाही. मला दुःख होते आणि तो माझा प्रोब्लेम आहे. लोक मला ट्रोल करू शकतात आणि त्यांना हवे ते म्हणू शकतात आणि मी सर्वांच्या मतांचा आदर करतो. मी येथे जगाला त्रास देण्यासाठी नाही आलोय किंवा मी काेणाला शिकवायलाही नाही आलोय. अख्खं जग मला ओळखतं.''



करणचा 'लायगर' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.