मुंबई : आपल्या बिनधास्त वागण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला करण जोहर इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीला चांगलाच घाबरतो. याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे. एका कार्यक्रमात त्याने नुकताच याबाबत खुलासा केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहरने सांगितले की, त्याला त्याच्या सिनेमाच्या स्क्रिनींगसाठी दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांना बोलवण्याची भीती वाटते. कारण जया बच्चन त्या लोकांपैकी आहेत जे कधीही खोटं बोलत नाहीत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाला तो घाबरतो. 


करण म्हणाला की, ‘सिने विश्वात असे काही लोक आहेत जे कधीही खोटं बोकत नाहीत. जया बच्चन यांचच घ्या. त्यांना सिनेमाच्या स्क्रिनींगला बोलवणं खतरनाक असतं. कारण त्या त्यांची प्रतिक्रिया सरळ खरं बोलून देतात. तुम्हाला जर त्यांना स्क्रिनींगला बोलवायचं असेल तर त्यांची प्रतिक्रिया ऎकण्यासाठीही तुम्हाला तयार रहावं लागेल. त्या मला म्हणतात की, मी तुझ्या सिनेमाच्या स्क्रिनींगला येणार नाही, कारण मी तुझ्यासोबत खोटं बोलू शकणार नाही. जर मला तुझा सिनेमा आवडला नाहीतर मी सरळ सांगणार आणि त्यामुळे तुला निराशा येईल’.