नीतू कपूरची सून बनण्यासाठी आलिया भट्ट तयार
करण जोहरने केला खुलासा
मुंबई : करण जोहर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मैत्री बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तिघांनी एकत्र काम देखील केले आहे. तसेच आलिया - रणबीरच्या रिलेशनशिपबद्दल कायम करण काही ना काही बोलत असतो. करण सध्या 'कॉलिंग करण सिझन 2' होस्ट करत आहे.
आता करणने आपल्या शोमध्ये रणबीर कपूरला बोलावलं आहे. या कार्यक्रमात करणने रणबीरला त्याच्या लव लाईफबद्दल विचारलं आहे. रणबीरने आपल्या नात्यातील अनेक चुका सांगायला सुरूवात केली. यानंतर रणबीरने देखील करणला काही प्रश्न विचारले. करण रणबीरला विचारतो की, तू एक चूक करतोस आणि मग तीच चूक सारखी सारखी करतोस. तेव्हा तुझ्या लक्षात येत नाही पण हे नातं चुकीचं आहे आणि ते तिथेच थांबवण गरजेच असतं.
यानंतर करण म्हणाला की, रणबीर तुला कळत असेल मी कशाबद्दल बोलत आहे. त्यानंतर करण रणबीरसोबत रॅपिड फायर राऊंड देखील खेळला. तेव्हा करणने सर्वात पहिला प्रश्न विचारला की, रणबीर तुझ्या फोनचा कोड काय आहे. त्यानंतर करणने रणबीरला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारलं होतं. तेव्हा रणबीरने विचारलं की, तुम्ही माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला द्याल. तेव्हा करणने सांगितलं की, तू जगातील सर्वात चांगला नवरा बनशील. करणच्या या प्रश्नावरून कळलं की, रणबीर आणि आलिया लवकरच लग्नाचा प्लान करत आहेत.