मुंबई : बॉलिवूडमधील दिग्दर्शक - निर्माता करण जोहर पिता झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी चांगलीच रंगली. मात्र त्याने बरेच दिवस आपल्या जुळ्या मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवणेच जास्त रास्त समजले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता काही महिन्यांनी त्याने त्याच्या जुळ्या मुलांचा एक छान फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 


याआधी आयफा अॅवार्डसाठी करण न्यूयॉर्कला गेला तेव्हा त्याने हा फोटो शेअर केला होता. त्यावेळी तो त्याच्या दोन्ही मुलांना खूप मिस करत होता. त्यामुळेच त्याने त्यांचा फोटो पोस्ट केला होता. पण या फोटोत केवळ त्याच्या मुलांचे हातच दिसत होते. पण आता रक्षाबंधनच्या निमित्ताने त्याने त्याच्या मुलांचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्यात त्याचे दोन्ही मुलांचे चेहरे स्पष्ट दिसत आहे. 


करणने रुही आणि यश या आपल्या जुळ्या मुलांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत रुही आणि यश त्यांची आजी हिरू जोहरच्या मांडीवर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 



यावर्षी करण सरोगसीद्वारे दोन जुळ्या बाळांचा पिता झालाय. सोशल मीडियावरून जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे करणने जाहीर केले होते. ‘मी एक चांगला बाप बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. माझ्या आयुष्यात रूही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांनी प्रवेश केला आहे. मी दोन मुलांचा बाप झालोय, यावर माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. या दोन चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्यातील एकटेपणा दूर केला’, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.