Karan Johar's Dharma Productions : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत निर्मिती करणाऱ्या लोकप्रिय प्रोडक्शन हाऊसपैकी एक म्हणजे करण जोहरचं धर्मा. आता करण जोहरच्या या धर्मा प्रोडक्शन विषयी एक मोठी बातमी समोर आी आहे. त्याच्या या प्रोडक्शन हाऊसचे 50 टक्के भागीदारी ही वॅक्सिन बनवणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी खरेदी केली आहे. या डील विषयी ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे की करण जोहरवर त्याच्या प्रोडक्शन कंपनीची 50 टक्के भागीदारी विकण्याची गरज का भासली. त्याशिवाय या कंपनीचं जे मुल्य लावलं आहे त्यानं देखील सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदार पूनावाला यांनी धर्मा प्रोडक्शनची 50 टक्के भागीदारी ही 1000 कोटींना खरेदी केली आहे. तर बाकीचे 50 टक्के हे करण जोहरचेच राहणार आहेत. त्याशिवाय करण जोहरच हा कार्यकारी अध्यक्ष राहणार आहे. तर अपुर्व मेहता हा मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहे. या डीलनंतर अदार पूनावाला यांनी सांगितलं की आता ते धर्मा प्रोडक्शनमध्ये भागीदाकी करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. आता पुढे धर्माला आणखी यशस्वी कसं करता येईल याची आशा आहे. दरम्यान, आता हे दोन दिग्ग्ज एकत्र आल्यानंतर आपल्याला नवीन कोणते प्रोजेक्ट्स पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले  आहे.


कसा होता कंपनीच्या रेव्हेन्यू? 


धर्मा प्रोडक्शनच्या रेव्हेन्यू 2023 मध्ये जवळपास 4 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या कंपनीचा रेव्हेन्यू हा 1040 कोटी होता. धर्मा प्रोडक्शनच्या खर्चात 4.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे होणाऱ्या नफ्यामध्ये कमी झाली आहे. 


कधी झाली कंपनीची सुरुवात?


धर्मा प्रोडक्शन विषयी बोलायचं झालं तर ही भारतातील सगळ्या लोकप्रिय आणि गाजलेल्या प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन कंपनींपैकी एक आहे. या कंपनीची सुरुवात करण जोहरचे वडील यश जोहर यांनी 1976 मध्ये केली होती. या प्रोडक्शन कंपनीनं आजवर अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. त्यात कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम सारखे काही चित्रपट आहेत. त्याशिवाय नुकतेच प्रदर्शित झालेले 'किल', 'बॅड न्यूज', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा', 'जिगरा', 'देवरा:  पार्ट 1' हे चित्रपट आहेत.