PHOTO : 19 व्या वर्षी 27 वर्षे मोठ्या प्रोड्यूसरशी लग्न, 16 वर्षांतच घटस्फोट; पुढं 'तिनं' चार मुलांच्या वडिलांशी केला निकाह

Entertainment : वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्यांदा 27 वर्षे मोठ्या प्रोड्यूसरशी लग्न केलं. त्यानंतर वाढदिवसालाच 16 वर्षांतच घटस्फोट घेतला. त्यानंतर वयाच्या 42 व्या वर्षी चार मुलांच्या वैवाहित लेखकांशी लग्न केलं. बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर कोण आहे ओळखलं का?

| Oct 22, 2024, 08:35 AM IST
1/10

बॉलिवूडची पहिली 'आयटम गर्ल' म्हणजेच सुंदर अभिनेत्री हेलन यांचा 21 नोव्हेंबरल 86 वा वाढदिवस असणार आहे. त्यांच्या आयुष्यातील अशा घटना सांगणार आहोत, ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

2/10

आज हेलन सिनेसृष्टीपासून दूर गेली असली तरी चाहते आजही तिच्या गाण्याचे फॅन आहेत. अभिनेत्रीने 50 आणि 70 च्या दशकात आपल्या उत्कृष्ट नृत्याद्वारे बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. हेलनच्या सौंदर्याचे आणि तिच्या नृत्याचे करोडो लोकांना वेडे लावंलय. यामुळेच तिला इंडस्ट्रीतील पहिली 'आयटम गर्ल' म्हटलं जातं. 

3/10

फार कमी लोकांना माहितीय हेलनने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेदना आणि यातना सहन करावा लागल्या आहेत. हेलनचा जन्म रंगूनमध्ये 1938 साली झाला होता. मात्र त्यानंतर महायुद्धाच्या काळात अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना पायीच भारताला यां लागलं. असं म्हटलं जातं की त्या काळात त्याच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते आणि त्यांची आई गरोदर होती. ट्रॅव्हल सिकनेसमुळे ज्याचा गर्भपात झाला.

4/10

भारतात आल्यानंतर हेलनने आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बॉलिवूडकडे वळले. बऱ्याच संघर्षानंतर 1951 मध्ये रिलीज झालेल्या 'शबिस्तान' चित्रपटात त्यांना ग्रुप डान्सरची भूमिका मिळाली. यानंतर अभिनेत्रीचे नशीब बदलले आणि तिला 'हावडा ब्रिज' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

5/10

या चित्रपटात तिने 'मेरा नाम चिन चिन चू'वर इतका जबरदस्त डान्स केला की ती रातोरात स्टार झाली. यानंतर अभिनेत्रीला चित्रपटांचा ढीग लागला आणि तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या करिअरमध्ये हेलनने कश्मीर की कली, एन इव्हनिंग इन पॅरिस, आराधना, अमर प्रेम या चित्रपटांमध्ये काम केले. हेलनने तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम आणि नृत्य केलंय.

6/10

बेली डान्ससाठी ओळखली जाणारी या अभिनेत्रीची भेट चित्रपट निर्माते प्रेम नारायण अरोरा यांच्याशी झाली, ज्यांना पीएन अरोरा म्हणतात. दोघांच्या वयात 27 वर्षांचा फरक होता, तरीही दोघांनी 1957 मध्ये लग्न केले. तेव्हा हेलन फक्त 19 वर्षांची होती.

7/10

दोघांचं लग्न जवळपास 16 वर्षे टिकलं. दोघांमध्ये पैशाच्या भिंती उभ्या राहिल्याचं बोललं जातंय. त्यावेळी हेलनने इंडस्ट्रीमध्ये एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवला होता आणि भरपूर पैसे कमावलं होतं, पण पीएन अरोरा तिचे पैसे पाण्यासारखे वाया घालवायचे. इतकेच नाही तर एक वेळ अशी आली जेव्हा पीएन अरोरा यांनी अभिनेत्रीला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेलं होतं, त्यानंतर अभिनेत्रीने वैतागून पतीचं घर सोडलं आणि त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्रीने 1974 मध्ये तिच्या 35 व्या वाढदिवशी घटस्फोट घेतला. 

8/10

घटस्फोटानंतर हेलनने लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांची भेट घेतली. एकेकाळी हेलनला इंडस्ट्रीत काम मिळवून देण्यासाठी त्यांनीच मदत केली होती. सालीनने त्याला 'डॉन', 'दोस्ताना' आणि 'शोले' सारख्या चित्रपटात काम मिळवून दिले. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

9/10

मात्र, त्यावेळी सलीम यांचं आधी लग्न झालं होतं, त्याला सलमान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलविरा खान ही चार मुलं होती. सलीमच्या पहिल्या पत्नीचं नाव सुशीला चरक (सलमा खान) होतं, जिच्यामार्फत त्यांनी हेलनशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी सलीम खान 45 वर्षांचे होते आणि हेलन 42 वर्षांच्या होत्या.

10/10

मात्र, सलीम खान यांनी पत्नी सलमा यांना हेलनसाठी कधीही एकटं सोडलं नाही. सुरुवातीला सलमा आणि तिची मुलं सलमान आणि अरबाज खान यांनी हेलनला स्वीकारलं नव्हतं. पण हळूहळू त्यांच्या नात्यात सुधारणा होऊ लागली. आज हे कुटुंब मुंबईत एकत्र राहतं. त्याचबरोबर सलमान, अरबाज आणि सोहेल हे देखील हेलनवर त्यांची आई सलमाप्रमाणे प्रेम करतात. अनेकदा सलमान तिच्यासोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करतो.