वडील- आजोबा माजी मुख्यमंत्री, आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात, कोण आहेत श्रीजया चव्हाण?

चव्हाण कुटुंबातील तिसरी पिठी राजकारणात सक्रीय होत आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. 

| Oct 21, 2024, 09:48 AM IST

Maharashtra Assembly Election: चव्हाण कुटुंबातील तिसरी पिठी राजकारणात सक्रीय होत आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. 

 

1/7

who is sreejaya chavan ex cm ashok chavan daughter fight election from bhokar

भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात खासदार श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून भोकर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

2/7

who is sreejaya chavan ex cm ashok chavan daughter fight election from bhokar

अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसंच, भोकर हा चव्हाणांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. आता अशोक चव्हाण यांच्या मुलीला तिकिट देण्यात आले आहे.

3/7

who is sreejaya chavan ex cm ashok chavan daughter fight election from bhokar

 माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण नंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजकीय वारसा चालवला. आता चव्हाणांनी विधानसभेच्या निमित्ताने त्यांचा राजकीय वारस घोषित केला आहे. श्रीजया चव्हाण या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. 

4/7

who is sreejaya chavan ex cm ashok chavan daughter fight election from bhokar

अशोक चव्हाण यांनी श्रीजया आणि सुजया या दोन मुली आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानादरम्यान चव्हाण काँग्रेसमध्ये होते. तेव्हा गांधींच्या स्वागताच्या बॅनरवर श्रीजयांचे फोटो झळकले होते. तर, मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणूनही बॅनर झळकले होते.

5/7

who is sreejaya chavan ex cm ashok chavan daughter fight election from bhokar

श्रीजया चव्हाण या पेशाने वकील आहेत. त्याचबरोबर त्या भाजप युवा मोर्चाचे काम करत आहेत. भाजयुमोने विकसित महाराष्ट्रासाठी आयडिया हा कार्यक्रम त्यांनी सुरु केला आहे.  

6/7

who is sreejaya chavan ex cm ashok chavan daughter fight election from bhokar

26 मे रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दरम्यान त्यांच्या वाढदिवशी मतदारसंघात भावी आमदार असे हॉर्डिंग झळकले होते. 

7/7

who is sreejaya chavan ex cm ashok chavan daughter fight election from bhokar

भोकर मतदारसंघातही त्या गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होत्या. जनसंपर्क वाढवताना दिसत होत्या.